शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

रूकडीतील पीडित बहिष्कृत कुटुंबियांना मिळाला न्याय, भंडाऱ्याच्या साक्षीने जातपंचायतीला मूठमाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 18:58 IST

खासदार धैर्यशील माने यांनी या घटनेची गंभीर दखल घेत धनगर समाजातील दोन्ही गटाची बैठक या वादाला मूठमाती दिली.

अभय व्हनवाडेरूकडी माणगांव  : रूकडी येथील धनगर समाजातील  सैन्यदलातील अधिकारी  देवेंद्र शिणगारे यांच्यावर  जातपंचायतीने बहिष्कार टाकून समाजातून बहिष्कृत केल्याच्या घटनेची खासदार धैर्यशील माने यांनी तात्काळ दखल घेतली. याबाबत काल, सोमवारी (दि ३०) सायकांळी  दोन्ही गटाची बैठक घेत जातपंचायतीमधील वादाला मूठमाती दिली. तब्बल पाच तास सुरू असलेली समोपचार बैठक रात्री उशिरा मिटली.खासदार धैर्यशील माने यांच्या जन्मगावी जातपंचायतीने धनगर समाजातील आठ-दहा घरावर  सामाजिक बहिष्कार टाकला होता. या  कुटूबांतील  सदस्यांना  मंदिरपूजा, सामाजिक कार्यात सहभाग करून न घेणे. दंडात्माक कारवाई, सामूहीक जमीन कसू न देणे अशा प्रकारे कुटुंबांना वाळीत टाकले होते. या वाळीत टाकलेल्या कुटुंबातील सदस्यच्या बरोबर रोजीरोटीचा व्यवहार करणाऱ्या सैन्यदलातील अधिकारी देवेंद्र शिणगारे यांच्या कुटुंबावर देखील गेली तीन वर्ष बहिष्कार  टाकला होता.देवेंद्र शिणगारे हे सैन्यदलात गेले असता मूळगावी असणारे पत्नी यांच्याबरोबर ही समाजातील कोणीही न बोलण्याचा फर्मान सोडण्यात आले होते. सर्व घटना असहाय्य झाल्याने धनगर समाजातील काही कुटुंबानी पोलीस अधिक्षक व हातकणगंले पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल केली होती. मात्र यांची दखल घेतील जात नव्हती.खासदार धैर्यशील मानेंनी दोन्ही गटास दरडावलेअखेर खासदार धैर्यशील माने यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, हातकणगंले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.एम पाटील, नायब तहसीलदार दिगबंर सानप, सामाजिक न्याय विभागाच्या नंदिनी जाधव सह धनगर समाजातील दोन्ही गटाची बैठक घेतली. बैठकीस दोन्ही गटाना समोर बसवून दोन्ही गटाचे समुपदेशन केले. समुपदेशन करून दोन्ही गट ऐकण्याचा मनस्थिती नसताना दोन्ही गटास दरडावून असला प्रकार रूकडी गावात खपवून घेतला जाणार नाही असा  सूर लावताच दोन्ही गट समझोतावर आला.दोन्ही गटास भंडाऱ्याची शपथसमझोतावर येताच खासदार माने यांनी दोन्ही गटास भंडाराची शपथ घेण्याची व समाजात  गुण्यागोविंदाने राहणेबाबत शपथ घेण्याचे आवाहन केले. समाजातील जमिन हिश्यानुसार वाटप, मंदिराचे काम पूर्ण होवू पर्यत काशीनाथ शिणगारे यांना अध्यक्षपद देण्याचे व समाजात सर्वांशी रोजीरोटीचा व्यवहार करण्याचे ठरल्यानंतर  सर्वांनी गळाभेट घेवून वादावर पडदा पडल्याचे सर्वांसमक्ष   सांगतिले. या बैठकीस सरपंच रफिक कलावंत, उपसंरपच रणजित कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल कुलकर्णी, देवेंद्र  शिणगारे, भिकाजी  शिणगारे, अनिल बागडी सह समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणूस म्हणून जगण्याचा अधिकार  मिळालागेली तीन वर्ष कुटुंबाने फार सोसले पण आम्ही माणूसकी  सोडली नाही. तीन वर्षात  वाईट अनुभव आले. देशसेवेसाठी  समर्पित जीवन असताना ही पोलीस विभागाने दखल घेतली नाही हे फार मोठे दुख आहे. माणसांनी  माणसाप्रमाणे वागले तरच माणूस म्हणून आपण जगू. झाले गेले गंगेला गेले येथून पुढे आम्ही एकोप्याने  राहू अशी मत सैन्यदलातील अधिकारी  देवेंद्र शिणगारे यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर