शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

फ्लॉवर, ढबू, हिरवी मिरची...; ही बाजारातून आणायच्या भाज्यांची लिस्ट नाही, ही आहेत निवडणूक चिन्हं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:26 IST

विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारांसाठी १९० चिन्हे जाहीर

कोल्हापूर : हिरवी मिरची, नरसाळे, झगा, पॅन्ट, फणस, प्लॉवर, कोल्हापुरी पायताण, उड्या मारण्याची दोरी, कॅरम, स्वीच बोर्ड, लोकर व सुई, पक्कड, ड्रील मशीन.. अहो तुम्हाला ही घरातील साहित्यांची यादी वाटत असेल तर जरा थांबा. या दैनंदिन गरजेच्या वस्तू कितीही महाग झाल्या असल्या तरी निवडणूक आयोगाने मात्र विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांवर चिन्हांच्या रुपाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. यातील काही चिन्हे पारंपरिक, काही बदलत्या काळाला अनुसरून, तर काही अगदीच मजेशीर आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना जाहीर होताच निवडणूक विभागाने विधानसभा मतदारसंघांसाठी अर्ज भरण्यात येणाऱ्या कार्यालयांबाहेर राष्ट्रीय पक्षांचे राखीव चिन्ह व अपक्ष उमेदवारांसाठीचे मुक्त चिन्हांचे मोठी चित्रच लावली आहेत. यातील बरीचशी चिन्हे अगदीच मजेशीर आहेत.

चिन्हांचा प्रभाव : ओळख आणि टवाळखोरीहीया निवडणूक चिन्हांचा मतांवर मोठा प्रभाव पडतो. उमेदवाराची फारशी माहिती नसलेला मतदार चिन्ह लक्षात ठेवून त्यासमोरील बटन दाबतो. लोकसभेला तुतारी आणि पिपाणीतील फरक न कळल्याने मोठा घोळ झाला होता. तुतारीऐवजी पिपाणीचा उमेदवार मते खाऊन गेला, असे बऱ्याच मतदारसंघात घडले. हे चिन्हच पुढील काही काळासाठी उमेदवाराची ओळख बनून राहते. काही वेळा त्यांना उमेदवारांकडून गमतीशीर विनोद आणि टवाळखोरीलाही सामोरे जावे लागते.

..अशी आहेत चिन्हेफळे व भाज्या : सफरचंद, फणस, अक्रोड, कलिंगड, फ्लॉवर, ढबू मिरची, हिरवी मिरची, फळांची टोपली, मटार भुईमूग, केक, द्राक्षे, चॉकलेट, आलं, भेंडी, पाव.

दागिने, कपडे : कानातले, नेकलेस, बांगड्या, अंगठी. कोट, बूट, कोल्हापुरी चप्पल, बेल्ट

अन्य साहित्य : दाढी करण्याचे रेझर, पंचिंग मशीन, स्वीच बोर्ड, खिडकी, कपडे अडकविण्यासाठी भिंतीची पट्टी, स्कूल बॅग, उशी, किचनमधील सिंक, करवत, हातगाडी, विटा, खाट.

घरातील साहित्य : कचरापेटी, जेवणाचा डबा, सेफ्टी पिन, नेल कटर, टूथपेस्ट, ब्रश, कात्री, पेट्रोलपंप, पाणी गरम करायचे रॉड, लायटर, कडी पेन स्टॅन्ड टाय, नुडल्सचे वाडगे, दरवाजाची कडी, फ्रीज, टीव्ही, लॅपटॉप, वाॅशिंग मशीन, जातं, पोळपाट बेलन, टोस्टर.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग