शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीस सरकारने कोल्हापुरातील शाहू समाधिस्थळाचा निधी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 16:17 IST

सत्ता परिवर्तनामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फटका राजर्षींच्या समाधी स्मारकाच्या कामाला बसला

भारत चव्हाणकोल्हापूर : आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दीचे अनेक कार्यक्रम शासनाच्या पुढाकारानेच केल्यानंतर आता मात्र सत्ता परिवर्तनामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फटका राजर्षींच्या समाधी स्मारकाच्या कामाला बसला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेला निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेल्या स्थगिती आदेशाने रोखला आहे.एकीकडे राजर्षी शाहूंच्या कार्याचे जाहीर भाषणात गोडवे गायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच समाधी स्मारकाच्या कामाचा निधी रोखायचा हा सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वडूज येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या, तसेच शाहू समाधी स्मारकाचा निधी रोखला नसल्याचे स्पष्टीकरण दिले; परंतु राज्य सरकारने हा निधी कोल्हापूरच्या समाजकल्याण विभागाकडे वर्गच केलेला नाही. शाहू समाधी स्मारकाचे दुसऱ्या टप्प्यातील काम समाजकल्याण विभागाच्या निधीतून करायचे असून, त्याकरिता १० कोटी ४० लाख ५६ हजार १०८ रुपयांचा निधी मंजूर झाला. समाधी स्मारकास तांत्रिक मंजुरीदेखील मिळाली आहे. १ एप्रिल २०२२ पासून मंजूर झालेली सगळी कामे थांबविण्याच्या सूचना आल्याचे समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजप सरकारचा अनुभवही वाईटच..राज्यात २०१४ ते २०१९ या काळात भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते तेव्हा शाहू समाधी स्मारकाला निधी मागितला होता; परंतु मागणीची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे पुन्हा त्या सरकारकडे महापालिकेने कधीच निधी मागितला नाही. नगरसेवकांनी पुढाकार घेत स्वनिधीतून निधी उपलब्ध करून देऊन समाधी स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले.दुसऱ्या टप्प्यातील काम करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निधी देण्याचे मान्य केले. महाविकास आघाडी सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी १० कोटी ४० लाखांचा निधी मंजूर केला. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यासाठी प्रयत्न केले.

ही कामे रखडली..

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल नूतनीकरण
  • हॉलमध्ये आर्ट गॅलरी, डॉक्युमेंटरी दाखविण्याची सोय
  • दलितमित्र दादासाहेब शिर्के उद्यान कम्पाउंड वॉल, लँडस्केपिंग
  • परिसरातील सात समाधींच्या दुरुस्तीसह नूतनीकरण
टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस