शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पदाधिकाऱ्यांसह सचिवाचा कारभार; दूध संस्थेत पाच लाखांचा अपहार, संस्थेत नाट्यमय सत्तांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:21 IST

माजगाव येथील इंदिरा दूध संस्थेच्या १२ संचालकांवर गुन्हा

पोर्ले तर्फ ठाणे : माजगाव (ता. पन्हाळा) येथील इंदिरा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेत संचालकांसह सचिवाने पाच लाख ११ हजार रुपये रकमेचा गैरव्यवहार केल्याचे फेर लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे. तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांसह सचिवांचा अपहारात सहभाग असल्याने लेखापरीक्षक सतीश वसंतराव पाडळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलिस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तत्कालीन अध्यक्ष रवींद्र जयवंत चौगले, उपाध्यक्ष शिवाजी बाबूराव जाधव, संचालक उत्तम जगन्नाथ गुरव, रवींद्र केशव पाटील, तुकाराम रामचंद्र मगदूम, नामदेव सदाशिव माने, अशोक यशवंत कांबळे, सीमा उदय खोत, उज्वला आकाराम माने, बाजीराव सदाशिव चौगले (मृत), सचिव जयवंत गणपती कुंभार (मृत), नेताजी श्रीपती कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मार्च २०२४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर आरोपी असणाऱ्या संचालकांकडे संस्थेच्या कागदपत्रांची मागणी केली असता ती देण्यास टाळाटाळ झाल्याने, सत्ताधारी गटाने सन २०२१-२२ या कालावधीमधील फेर सरकारी लेखीपरीक्षण केले. संस्थेत रोखीने जमा झालेली रक्कम, किर्दीप्रमाणे असणारी रोख शिल्लक रक्कम तेरीज पत्रकास आणि ताळेबंदास दर्शविलेली नाही, शिवाय बँकेत भरणा चलन पावती नसल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले.तत्कालीन पदाधिकारी असणाऱ्या आरोपींनी अधिकाराचा गैरवापर करून संगनमताने परस्पर संस्थेत ५ लाख ११ हजार २९८ रुपयांचा घोटाळा केल्याचे फेर लेखी परीक्षणात उघड झाले. त्यानंतर संबंधितांना लेखापरीक्षकांनी गैरव्यवहार केलेली रक्कम भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. याला सहा महिन्यांची कालावधी उलटूनही संबंधितांनी गैरव्यवहाराची रक्कम वेळेत न भरल्याने लेखापरीक्षकांनी १२ जणांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून त्यांच्या विरोधात पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

संस्थेत नाट्यमय सत्तांतर२५० सभासद असणाऱ्या इंदिरा दूध संस्थेची मार्च २०२३ मध्ये निवडणूक झाली होती. निवडणुकीत दोन्ही गटांचे ५/५ संचालक निवडून आल्याने, चिठ्ठी टाकून अध्यक्ष, उपाध्यक्ष, निवड झाली होती. विरोधी पाच संचालकांना हे पटले नसल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने प्रशासक आले. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये फेर निवडणूक झाल्याने चिठ्ठीद्वारे पदाधिकारी झालेल्या गटाला १० जागा मिळाल्याने संस्थेत सत्तांतर झाले.