शहरं
Join us  
Trending Stories
1
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
2
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
3
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
4
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
5
५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे
6
प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
7
'पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप
8
‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
9
आईची माया! शहीद मुलाला थंडी वाजू नये म्हणून पुतळ्यावर घातलं ब्लँकेट, भावूक करणारा Video
10
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
11
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
12
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
13
'विराट' दूरावा संपला! ज्या गोष्टीपासून लांब राहिला, तिकडे पुन्हा वळला किंग कोहली; ‘यू टर्न’ चर्चेत
14
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
15
ना कुठली जोखीम, ना पोलिसांचं टेन्शन...आता लेट नाइट पार्टीनंतर VVIP सारखं घरी जाऊ शकता, कसं?
16
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
17
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
18
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
19
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
20
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: धनराज नाकाडेंसह कारीदकर, बीडकर निलंबित; 'उच्च शिक्षण'मधील अनियमितता भोवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:57 IST

भरतीमुळेच अडकले तिघे, अनेकांचे धाबे दणाणले

कोल्हापूर : शून्य प्रलंबितता व दैनंदिन प्रकरणे निकाली काढण्यासाठी राबवलेल्या मोहिमेअंतर्गत कामकाजात अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवत राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कोल्हापूर विभागाचे तत्कालीन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे, तत्कालीन प्रशासन अधिकारी धैर्यशील कारीदकर आणि वरिष्ठ लिपिक बाबासाहेब बीडकर यांना गुरुवारी निलंबित केले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कक्ष अधिकारी हे. प. बाविस्कर यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. डॉ. नाकाडे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. कोल्हापूरसह राज्याच्या उच्च शिक्षण विभागातील पहिलीच मोठी धडक कारवाई केल्याने शिक्षण विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.तत्कालीन सहसंचालक डॉ. नाकाडे यांच्या कार्यकाळात कोल्हापूर विभागांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. ही भरती प्रक्रिया अनियमित असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. काही महिन्यांपूर्वी उच्च शिक्षण विभागाने शून्य प्रलंबितता व दैनंदिन प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्यभरातील सहसंचालक कार्यालयांत विशेष मोहीम राबविली.मोहिमेअंतर्गत कोल्हापूर विभागीय सहसंचालक, कार्यालयाच्या तपासणीदरम्यान अनियमितता आढळून आली. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संदीप पाटील व केशव तुपे यांची द्विसदस्यीय समिती नेमली. नियुक्त समितीने त्यांचा अहवाल ७ मे रोजी शासनास सादर केला. अहवालामध्ये तत्कालीन सहसंचालक डॉ. नाकाडे, तत्कालीन प्रभारी कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी धैर्यशील कारीदकर आणि वरिष्ठ लिपिक बाबासाहेब बीडकर या तिघांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार तिघांचे निलंबन केले आहे.

भरतीमुळेच अडकले तिघेमहाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र, हा नियम डावलत डॉ. नाकाडे यांच्या कार्यकाळात जवळपास शंभर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचा आरोप झाला. विशेष म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यालयाला अचानक भेट दिल्यानंतर त्यांनाही यातील काही ऑर्डर आढळून आल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी ॲक्शन मोडवर येत थेट कारवाईचा बडगा उगारला.

ई-ऑफिसशिवाय कामकाज भोवलेउच्च शिक्षण विभागात पारदर्शकता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र, कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे कामकाज ई-ऑफिसशिवाय सुरू असल्याचे मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आले होते. शिवाय झिरो पेंडन्सी उपक्रम सुरू असतानाही अनेक प्रकरणे प्रलंबित व अनियमित असल्याचे दिसून आल्याने याच्या चौकशीसाठी समिती नेमली होती.