शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धामणी नदीवरील बंधारा गेला वाहून, शेतीचे नुकसान; कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 11:19 IST

शेतकऱ्यांमधून पाटबंधारे विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

महेश आठल्ये   म्हासुर्ली (राधानगरी): पाटबंधारे विभागाने गत आठवड्यात केलेल्या मनमानी उपसा बंदीमुळे बंधाऱ्यात वरून वाहून आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे धामणी नदीवरील बळपवाडी (ता. पन्हाळा) गवशी पाटीलवाडी (ता. राधानगरी ) या दरम्यान असणारा मातीचा बंधारा आज सकाळच्या सुमारास फुटला. बंधारा फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच पनोरे (ता. पन्हाळा) परिसरात पाणी गेल्याने त्या परिसरातील विद्युत पंप पाण्यात बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.धामणी खोऱ्यात धामणी धरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्याकडून ठिकठिकाणी मातीचे बंधारे घातले जातात. अंबर्डे (ता. पन्हाळा) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी यावर्षी त्यात उशिराने पाणीसाठा केल्यामुळे हा बंधारा रिकामा राहिला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एकतर्फी निर्णय घेत गत आठवड्यात उपसा बंदी जाहीर केली होती. या उपसा बंदीच्या निर्णयामुळे या परिसरात तीव्र असंतोष पसरला होता. उपसा बंदीमुळे वरील धरणातील पाणी गवशी पाटील वाडी -बळपवाडी बंधाऱ्यात येऊन साठले होते. अंबर्डे बंधारा रिकामा असल्यामुळे या मातीच्या बंधार्‍यावर पाण्याचा दाब वाढल्याने हा बंधारा मध्येच फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. तर, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार असून या बंधाऱ्याच्या खालील बाजूस असणाऱ्या दोन्ही नदी तीरावरील शेकडो मोटर पंप पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांमधून पाटबंधारे विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर