शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल होताच कोल्हापूर मनपाचा ठेकेदार श्रीप्रसाद वराळे गायब, पोलिसांनी घरात जाऊन घेतली झडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:56 IST

साक्षीदारांचे जबाब घेणार

कोल्हापूर : कसबा बावडा येथील कामांसाठी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप करणारा ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराळे (वय ३१, रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा, कोल्हापूर) हा गुन्हा दाखल होताच गायब झाला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी (दि. २७) त्याच्या कसबा बावडा येथील घराची झडती घेतली. मात्र, तो सापडला नाही. पोलिसांकडून सोमवारी (दि. २८) साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.महापालिकेतील अधिकाऱ्यांनी टक्केवारीनुसार पैसे घेऊन बिले मंजूर केल्याचा गंभीर आरोप ठेकेदार वराळे याने केला होता. अधिकाऱ्यांना ऑनलाइन पैसे पाठवल्याचा पुरावाही त्याने प्रसारमाध्यमांकडे सादर केला होता. त्यानंतर ॲक्शन मोडवर आलेल्या महापालिका प्रशासनाने वराळे याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वराळे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अटकेसाठी रविवारी दुपारी पोलिसांचे पथक वराळे याच्या घरी गेले होते. मात्र, तो सापडला नाही. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. त्याचा मोबाइल नंबर बंद असून, शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महापालिकेकडे कागदपत्रांची मागणीवराळे याने केलेल्या फसवणुकीचा तपास करण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. सोमवारी कागदपत्रांचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच या गुन्ह्यातील काही साक्षीदारांचे जबाब नोंदवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वराळे याच्या आरोपांमुळे महापालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.