शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

Kolhapur Flood: रेड झोन कागदावर, पूर रस्त्यावर; २०१९ पूर्वीच पूरक्षेत्रात मोठी बांधकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:23 IST

प्राधिकरणाने तरी सावध राहावे

कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरात आलेल्या महापुरामुळे पूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकून केलेली बांधकामे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. पूर क्षेत्रातील बांधकामे थांबविण्यासाठी तातडीने ब्ल्यू लाइन व रेड लाइन मार्किंग होणे आवश्यक होते; परंतु रेड झोन क्षेत्र अंतिम करण्याची प्रक्रियादेखील जाणीवपूर्वक रखडवली गेली. त्याचा फटका मात्र पुढे वर्षानुवर्षे नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने तरी सावध होऊन अशी चूक करू नये, अशी अपेक्षा आहे.जलसंपदा विभागाने रेडझोन निश्चित करून ब्ल्यू लाइन व रेड लाइनचे मार्किंग केले असून, त्याचे नकाशे महापालिका प्रशासनाला सादर केले आहेत. दि. ७-१२-२०१९ रोजी पहिली ब्ल्यू लाइन पूर्ण झाली, त्यानंतर दि. ३-०६-२०२२ रोजी दुसरी रेडलाइनही निश्चित केली गेली. त्यानंतर महापालिका नगररचना विभागाकडून सध्या बांधकामाबाबत कडक निर्बंध लादले आहेत; परंतु रेडझोन उशिरा जाहीर करण्याचा प्रकार म्हणजे ‘बैल गेला अन् झोपा केला’ असेच म्हणावे लागते.सन २०१९ पूर्वी शहरातील पूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली. पूर क्षेत्रात बांधकामाला परवानगी देताना नगररचना विभागाला भविष्यकाळातील महापुराच्या काळात नागरिकांच्या घरात पाणी शिरणार यांची शंका होती. त्यामुळे पूर क्षेत्रात बांधकाम परवानगी देताना भराव टाकायचा नाही, तीन मीटर उंचीवर स्लॅब टाकून बांधकामे करायची. खालची जागा ही वाहनतळ म्हणून वापरावी अशा अटी घालण्यात आल्या. दुर्दैवाने महापालिकेचे नियम म्हणजे मोडण्यासाठीच असतात असा समज झालेल्या बांधकाम व्यावसायिकांनी मोठे भराव टाकून इमारती उभारल्या. ही बांधकामे सुरू असताना आपणच घातलेल्या अटी पाळल्या आहेत की नाही याची खत्री नगररचना विभागाने करून घेतली नाही.सन २०१९ पूर्वी झालेल्या बेजबाबदार बांधकामे आणि भरावांमुळे २०१९ व २०२१ चे मोठे महापूर आले. त्यानंतरही आलेल्या महापुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यावर्षीही बऱ्याच घरांना, अपार्टमेंटना महापुराच्या पाण्याने विळखा घातला. यापुढील काळातही अशी समस्या वारंवार उद्भवणार आहे. कारण रेडझोन निश्चित झाला असला तरी पुढील काळात बांधकामे होणार नाहीत. मात्र, झालेली बांधकामे आहेत तशीच राहणार आहेत. त्याला काहीच करता येणार नाही.

इंद्रजित कॉलनीत टाकला भरावइंद्रजित कॉलनी, जाधववाडी येथे दरवर्षी पाणी येत आहे. वास्तविक जेव्हा ४७ फूट पाणी पातळी असेल तेव्हाच पाणी यायचे; परंतु या भागात व आसपासच्या भागात जो भराव टाकण्यात आला आहे, त्यामुळे यावर्षी हे पाणी कॉलनीमध्ये आले. गटारी, नाले तुंबून या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्याने हे पाणी तेथे साचून राहत आहे. या परिसरात भराव टाकल्यामुळे सर्वांना दरवर्षी स्थलांतरित होण्याची वेळ आली असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.

आता कशी परवानगी दिली जाते

  • नदीपात्र ते ब्ल्यू लाइन बांधकाम परवानगी नाही
  • ब्ल्यू लाइन ते रेडलाइन काही अटींवर परवानगी
  • भराव टाकायचा नाही, तीन मीटर स्टील्ड बांधकाम
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर