शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीचे संवर्धन झाले.. मूळ स्वरूप खुलले; आजपासून मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:06 IST

जिल्हाधिकाऱ्यांना आज देणार अहवाल

कोल्हापूर : आर्द्रतेमुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडलेले पांढरे डाग, यासह पूजाविधी आणि वातावरणाचा झालेला परिणाम कमी करत, केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी देवीच्या मूळ मूर्तीचे रूप खुलवले. मूर्ती अगदी नव्यासारखी भासावी अशा रीतीने हे काम करण्यात आले आहे.मंगळवारी मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज बुधवारी धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी १२ नंतर मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू होईल. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संवर्धन प्रक्रियेची पाहणी केली.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेसाठी सोमवारी रात्री साडे आठ वाजता केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे उपअधीक्षक डॉ.विनोदकुमार, नीलेश महाजन, सुधीर वाघ आणि मनोज सोनवणे हे तज्ज्ञ काेल्हापुरात दाखल झाले. सोमवारी रात्री त्यांनी देवीच्या मूर्तीची पाहणी केली व मंगळवारी सकाळीच संवर्धनाला सुरुवात केली. दिवसभर हे संवर्धनाचे काम चालले. अंबाबाई मूर्तीवरील पांढरे ठिपके रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे पाषाणाचा मूळ नैसर्गिक रंग दिसू लागला.आज बुधवारी सकाळी अंबाबाईच्या मूळ मूर्तीत प्राणतत्त्व देण्याचा धार्मिक विधी, अभिषेक आरतीनंतर दुपारी १२ नंतर मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली होईल, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. दरम्यान, मंगळवारीही भाविकांनी पितळी उंबरा येथूनच उत्सवमूर्ती व देवी कलशाचे दर्शन घेतले.

वाघ, गदा, नागाचे वेटोळे दिसू लागले..अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडल्याने पाषणाचा रंग वेगवेगळा दिसत होता, पण आता स्वच्छतेमुळे आणि मूर्तीवर संवर्धनाचा लेप लावल्याने अंबाबाईच्या मागील वाघ, गदा, दागिने, डोक्यावरील नागाचे वेटोळे ही चिन्हेही दिसू लागली आहेत. भविष्यात हे पांढरे डाग दिसणार नाहीत अशी अपेक्षा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना आज देणार अहवालअंबाबाई मूर्तीची स्थिती कशी आहे, याबाबत पुरातत्त्व खात्याचे अधिकारी आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे सहा महिन्याला संवर्धन करावे लागते, पण अंबाबाई मूर्तीच्या बाबतीत ते वर्षाला करावे लागेल.