शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोकण रेल्वे सुरु करण्याचे आव्हान, कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक

By संदीप आडनाईक | Updated: April 25, 2024 13:43 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वे कोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर ...

संदीप आडनाईककोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वेकोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर असूनही सुविधांबाबत कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. १३२ वर्षे झाल्यानंतरही कोल्हापूरच्या संथ रेल्वेला पुरेशी ‘गती’ मिळालेली नाही. कोकण रेल्वे, लांब पल्ल्याच्या रेल्वे, वंदे भारतसारखे नवीन रेल्वे प्रकल्प सुरू करण्याबाबत अजूनही कोल्हापूरला ठेंगा दाखवला जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधींची ‘शक्ती’ मिळण्याची गरज आहे.

गेल्या ५० वर्षांपासून कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी लोकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या मागण्या आता थोड्या प्रमाणात पूर्ण होत आहेत. कोल्हापूर ते मुंबई आणि पुढे अन्यत्र वेगाने जाण्यासाठी कोल्हापूर ते पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण अत्यावश्यक होते. मात्र कोल्हापूर, मिरज ही स्थानके दक्षिण रेल्वे विभागामध्ये मोडत असल्याने कोल्हापूरचा कधी विचारच झाला नाही. त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरला येण्यासाठी १० तासांचा मोठा कालावधी लागत होता.आता दुहेरीकरण-विद्युतीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण हाेत आहे. त्यामुळे नवीन रेल्वेगाड्यांचा मार्ग मोकळा होईल. मिरज-कुर्डूवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर आणि हैदराबादपर्यंत रेल्वे प्रवास शक्य झाला आहे. दिल्ली, धनबाद, अहमदाबादसाठी रोज रेल्वेची मागणी असूनही ती आठवड्यातून एकदा सोडली जाते. यामुळे व्यापार, उद्योगाला मर्यादा आहेत.

कोकण रेल्वे कोल्हापूरला कधी जोडणारकोकणाला कोल्हापूर जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांची तरतूद केली. पण ५० वर्षे होऊन गेली; परंतु ही मागणी अद्यापही सर्वेक्षणाच्याच पातळीवर आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी जोडल्या जाऊन उद्योग, व्यापाराला चालना मिळणार आहे. ही जमेची एक बाजू सोडल्यास अन्य सुविधांबाबत ठेंगाच दाखविला असेच म्हणावे लागेल.

मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतचतत्कालीन रेल्वेमंत्री नितीशकुमार यांची कोल्हापूर मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतच विरली. त्याचा पाठपुरावा कोणत्याच लोकप्रतिनिधींनी केला नाही. सध्याची इमारत अपुरी पडत असल्याने उशिरा का होईना अमृतभारत योजनेतून पुनर्विकासाचे काम सुरू आहे; पण त्याला गती नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

  • १८९१ : मिरज ते कोल्हापूर पहिली रेल्वे सुरू
  • ४८ किलोमीटरचा पहिला ट्रॅक शाहू महाराजांच्या वैयक्तिक निधीतून
  • १९७१ : मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन
  • २०२० : कोल्हापर-मिरज एकेरी विद्युतीकरण मार्ग

 

  • ४ एकूण प्लॅटफाॅर्म
  • ११ एक्स्प्रेस
  • ४ डेमू गाड्या
  • २ सुपरफास्ट
  • १७ : एकूण धावणाऱ्या रेल्वे

कोल्हापूर रेल्वेस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण गतीने पूर्ण होण्याची गरज आहे. डेमू गाड्यांची संख्या वाढवणे, सांगली, पुणे शटल सर्व्हिस सुरू करणे, कोल्हापूर ते वैभववाडी, मुंबईसाठी नवीन गाडी सुरू करणे, फेऱ्या वाढवणे, वंदे भारत या गाड्या होणे अपेक्षित आहे. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समिती 

दुसरे रेल्वे टर्मिनल केल्यास नवीन लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू होतील, कोल्हापूर-मिरज दुसरी रेल्वे लाइन टाकणे, कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचा पाठपुरावा करणे, कऱ्हाड-बेळगाव नवीन रेल्वे मार्ग कोल्हापूरला महामार्गाशी समांतर करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या केल्या; पण हे प्रश्न सुटलेले नाहीत. ते मार्गी लागल्यास जिल्ह्याच्या पर्यटन, व्यापार उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या संधी येतील. - मधुसूदन पावसकर, अध्यक्ष, युनिटी करवीर विकास संघ मंच, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे