शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एकीकरण समितीची 'चलो मुंबई'ची हाक!, शरद पवारांशी चर्चा करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:33 IST

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बेळगावात झाली बैठक

बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यावर असलेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जाग आणून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ''चलो मुंबई''ची हाक देण्यात आली आहे. २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी हजारो सीमावासीय मुंबईला धडकणार आहेत. येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. बेळगाव येथे गुरुवारी झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेला महामेळावा दडपण्यासाठी समिती नेत्यांना अटक करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीने ‘चलो कोल्हापूर’ची हाक देत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन छेडले. सीमाप्रश्न सध्या अंतिम टप्प्यात आला असून महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या तारखा लांबणीवर पडत आहेत.कर्नाटक सरकारकडून खटल्यासाठी दरमहा ६० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, सीमाप्रश्नी खटला चालविण्यासाठी वकिलांना फी देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. ही परिस्थिती अशी असेल तर सीमाप्रश्नी खटला कुणाच्या आशेवर लढवायचा? असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यामुळे महाराष्ट्राला जाग आणून देण्यासाठी २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आंदोलन छेडण्यात येणार आहे.बैठकीत शहर समितीचे दीपक दळवी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, रणजित चव्हाण पाटील, बी. डी. मोहनगकर आदींसह इतर समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकSharad Pawarशरद पवार