शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील बेपत्ता महिलेचा भोगावती नदीपात्रात मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 21:48 IST

कोपार्डे -कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावर असलेल्या बालिंगे पुलाजवळ भोगावती नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला.ऋतुजा स्वप्निल कांबळे (वय २२) रा. लक्ष्मी कॉलनी,टेंबलाईवाडी, ...

कोपार्डे -कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावर असलेल्या बालिंगे पुलाजवळ भोगावती नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला.ऋतुजा स्वप्निल कांबळे (वय २२) रा. लक्ष्मी कॉलनी,टेंबलाईवाडी, कोल्हापूर असे या महिलेचे नाव असल्याचे राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या वर्णनावरून समोर आल्याने तिच्या नातवाईकांना बोलावून करवीर पोलिसांनी खातरजमा केली.पती स्वप्नीलने मृतदेह ऋतुजाचा असल्याचे सांगितले. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे. 

 याबाबत मिळालेली माहिती अशी बालिंगा पुलाजवळ भोगावती नदी पात्रात नागदेववाडी येथील कांही युवक शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास पोहायला गेले होते. त्यांना महिलेचा मृतदेह नदीत पाण्यावर तरंगताना दिसला. याची माहिती बालिंगा पोलीस पाटील सुरेश पाटील यांना देण्यात आली. त्यांनी याची माहिती करवीर पोलिसांना दिली.

 करवीर पोलिसांनी जागेवर येऊन पंचनामा केला.राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी( दि. २९) रोजी लक्ष्मी कॉलनी टेंबलाईवाडी येथून ऋतुजा कांबळे ही पहाटे साडेचार वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद पती स्वप्निल तानाजी कांबळे याने दिली होती. फिर्यादितील वर्णना प्रमाणे या महिलेची वेशभूषा असल्याने ओळख पटवण्यासाठी  ऋतुजाचा पती स्वप्नील व नातेवाईकांना करवीर पोलिसांनी बोलावून घेतले. स्वप्नीलने मृतदेह ऋतुजा असल्याचे ओळखले. करवीर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय  तपासासाठी शासकीय रूग्णालयात पाठवला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.