शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

Kolhapur: माणगाव‌ येथील कुबेर पाटील यांचे देहदान, तेरा वर्षापूर्वी केला होता संकल्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:06 IST

आजारपणामुळे मृत्यू होवू नये म्हणून घ्यायचे विशेष काळजी

अभय व्हनवाडे रूकडी/माणगाव: माणगाव ता. हातकणगंले येथील कुबेर आण्णा पाटील (आमगोंडा) (वय ८०) यांनी मृत्यू पश्चात देहदान करावे असे लेखी लिहीलेल्या पत्रा आधारे त्यांचे देहदान करण्यात आले.‌ त्यांच्या या निर्णयामुळे गावात देहदान चळवळीला बळ मिळाले. याआधी पारीसा कोरगांवे यांनी मृत्यू पश्चात नेत्रदान केले होते. त्यानंतर कुबेर पाटील यांनी ‌देहदान करून चळवळीस प्रेरणा दिली.शाकाहारचे पुरस्कर्ते कुबेर पाटील १९७२ साली  बी कॉम पदवीधारण केली. ते माध्यमिक शिक्षक म्हणून कोकणात कार्यरत असताना ते राहत असलेला ठिकाणी पशुहत्या होत असल्याने त्यांनी शिक्षकीपेक्षा सोडून एलएलबी शिक्षण घेतले. पण, वडिलांच्या रेट्यामुळे त्यांनी तात्कालीन महावीर बँक येथे तब्बल तीस वर्ष नोकरी केली अन् १९९६ साली नोकरीचा राजीनामा दिला.त्यांच्या मित्र परिवारामध्ये देहदान‌ चळवळीबाबत चर्चा व संवाद होत असल्याने त्यांनी २०११ ला सीपीआर येथे देहदान बाबत अर्ज ही केला‌ होता.कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित आल्यानंतर ते नेहमी मरणानंतर देहदान करावे असा रेटा धरत होते. शिवाय देहदानबाबत घरी सर्वांची जागरूती करत. काल, गुरुवारी (दि .१५) पहाटे त्यांचे निधन झाले. मृत्यूनंतर त्यांचा देह कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय विद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.आजरपणामुळे मृत्यू होवू नये म्हणून घ्यायचे विशेष काळजीकुबेर पाटील यांच्या पत्नीचे २०१९ ला निधन झाले. निधनानंतर देहदान करण्याचा त्यांचा संकल्प होता. पण आजरपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने संकल्प पूर्ण होवू शकला नाही. यामुळे ते आपला मृत्यू आजाराने होवू नये याकरिता नेहमी  योगासन, साधा आहार तसेच व्यायाम करीत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरOrgan donationअवयव दान