शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आत्मा शुद्धी पर्युषण पर्वामागील मूळ उद्देश, ‘मिच्छा मी दुक्कडं’ म्हणजेच काय? जाणून घ्या

By संदीप आडनाईक | Updated: September 16, 2023 15:51 IST

संवत्सरीच्या दिवशी जैन समाजातील लहान बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व निर्जळी व्रत करतात

संदीप आडनाईककोल्हापूर : पावसाळ्यातील चार महिन्यात पृथ्वीतलावर सर्वत्र हिरवळ वाढते. या काळात बऱ्याच प्रकारचे प्राणी सूक्ष्मजीव जन्माला येतात. हे सर्व लक्षात घेऊन जैन मुनींनी या काळात एकाच ठिकाणी राहून देवाची उपासना करण्याचा संदेश दिला आहे. पर्युषण पर्व काळात मन, वचन, काया, यांची संपूर्णपणे शुद्धी केली जाते. साधनेद्वारे समस्त जीवांची माफी मागितली जाते. आत्मा शुद्धी हा पर्युषण पर्व यामागील मूळ उद्देश आहे.संवत्सरीच्या दिवशी जैन समाजातील लहान बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व निर्जळी व्रत करतात, स्थानक, मंदिर येथे आलोयना वाचन करतात आणि त्यानंतर ‘मिच्छा मी दुक्कडं’ म्हणजेच मी समस्त जीवांची माफी मागतो, असे म्हणतात. सायंकाळी जैन बांधव त्यांच्या धार्मिक स्थळी एकत्र येऊन प्रतिक्रमन करतात, यामध्ये ८४ लाख प्राणिमात्रांची क्षमायाचना केली जाते.भगवान महावीर यांनी समता, क्षमा आणि संयम या तीन सूत्रांद्वारे आत्मकल्याण करण्याचा मार्ग दाखविला आहे. पर्युषण पर्व सर्वांना काळात या सर्वांचा अंगीकार केला जातो. क्षमा मागणे आणि समोरच्या व्यक्तीला माफ करणे या दोन फार मोठ्या गोष्टी आहेत.जैन संवत्सरी पर्वाविषयी सामान्य नागरिकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत. पर्युषण पर्व हा प्रत्येकाने साजरा करायला हवा, कारण त्यामुळे बिघडलेली कित्येक नाती पुन्हा जुळून येऊ शकतात. दुखावलेली कित्येक मने पुन्हा एकत्र येऊ शकतात, त्यामुळे हा कोणत्या ही एका जाती-धर्मा पुरता मर्यादित राहणारा सण न होता तो समस्त जगासाठी तो क्षमापणा दिन ठरावा. ज्यामुळे शेकडो अवघड वाटणारे प्रश्न सुटतील.

श्वेतांबर पंथीय - १३ दिवसीय पारणोत्सव (९ ते २१ सप्टेंबर)- मुनिश्री कृपाशेखर विजय महाराज आणि साध्वी अचिंत्यप्रभाश्री महाराजांच्या उपस्थितीत २३४ तपस्वींचा सिद्धितप शंखनाद- स्थळ : महावीर नगरातील श्री वासुपूज्य जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, महावीर नगर.

दिगंबर पंथीय - सम्यक ज्ञान पावन वर्षायोग (१६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर)- प.पू. १०८ संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य निर्यापक श्रमण मुनिश्री १०८ नियमसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत षोडशकारण व दशलक्षण महापर्व- स्थळ : श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर संघ, आर.के. नगर, मोरेवाडी रोड, शेंडा पार्क.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर