शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

कोल्हापुरातील वातावरण नाताळमय, तयारीला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 12:06 IST

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कॅरोल सिंगिंगचीही धूम

कोल्हापूर : नाताळची गाणी गात तरुण, तरुणीचे गट घरोघरी भेट देत आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरातील ख्रिस्ती बांधवांच्या वसाहतीमध्ये तसेच घराघरातील वातावरण नाताळमय झाले आहे. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावटी करण्यात आल्या आहेत. नाताळच्या तयारीला शहर आणि जिल्ह्यात वेग आला आहे.ख्रिस्ती समाजातील मोठा सण म्हणून नाताळकडे पाहिले जाते. हा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे ख्रिस्ती घरांमध्ये नाताळच्या तयारी अंतिम टप्प्यात आहे. घरोघरी केक, डोनट आणि विविध गोड पदार्थ बनविण्यामध्ये महिला व्यस्त आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कॅरोल सिंगिंगचीही धूम शहरात सुरू आहे. तरुण-तरुणींचे गट ख्रिस्ती कुटूंबाला भेट देऊन गाणी गात आहेत. त्यांच्या रात्रभर कॅरोल सिंगिंगमुळे शहरातील वातावरण नाताळमय झाले आहे.बाजारपेठेतही नाताळची खरेदी जोरात सुरू आहे. विविध बेकरी, हॉटेल्समध्ये सांताक्लॉजचे मुखवटे आणि ख्रिसमस ट्री लावून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. बेकरीमध्येही केक, डोनटसह इतर पदार्थांना मागणी वाढली आहे.शहरातील वायल्डर मेमोरिअल चर्च, ख्राइस्ट चर्च, सेव्हंथ डे चर्च, ऑल सेंटस चर्च, होली इव्हॅजलिस्ट चर्च, ब्रह्मपुरी, विक्रमनगर येथील ख्रिस्ती समाजाच्या चर्चसह सर्वच लहान- मोठ्या चर्चमधून नाताळनिमित्त विविध प्रार्थना केल्या जात आहेत. कँडल लाइट सर्व्हिसही सुरू आहे. दरम्यान, सोमवारी ख्रिसमसनिमित्त सकाळी आठ वाजेपासूनच सर्व चर्चमध्ये प्रार्थना तसेच गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दिवशी विविध सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChristmasनाताळ