शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बसस्थानकांचे रूपडे पालटणार, एसटीच्या दत्तक योजनेस सुरुवात 

By सचिन भोसले | Updated: July 4, 2023 13:50 IST

उद्योगसमूहांना जाहिरात अन् विक्री करण्याची संधी

सचिन भोसलेकोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळ राज्यातील ५८० बसस्थानकांना स्वच्छ, सुंदर बनविणार आहे. त्याकरिता एसटी बसस्थानक दत्तक योजना जाहीर केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर विभागातील अ, ब आणि क वर्गातील एकूण २४ बसस्थानकांचे रूपडे पालटणार आहे. ही स्थानके लघु, मध्यम, मोठे उद्योजक, व्यापारी संस्था यांच्याकडे स्वारस्य अभिव्यक्ती सूचना मागविण्यात आल्या आहेत. या उद्योग संस्थांनी दत्तक घेऊन वर्षभर स्वखर्चाने विकसित देखभाल करावी लागणार आहे. त्या बदल्यात या उद्योगांना तेथे आपले उत्पादन किंवा सेवेची जाहिरात आणि विक्री करण्याची संधी दिली जाणार आहे.राज्य शासनाने १ मेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत राज्यातील ५८० बसस्थानकांचा समावेश होता. स्वच्छ बस, बसस्थानके, स्वच्छ आणि टापटीप स्वच्छतागृहे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे ही या उद्योगांकडून महामंडळाला अपेक्षित आहे. त्याच्या बदल्यात उद्योगाला स्वउत्पादनाची जाहिरात आणि विक्रीही करता येणार आहे.दत्तक घेणाऱ्या संस्थांना करावी लागणार आहेत ही कामे..बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची किरकोळ डागडुजी, विद्युत उपकरणांची दुरुस्ती करून विद्युत दिवे, पंखे सुव्यवस्थित करावे लागणार आहेत. रंगरंगोटी, प्रसाधनगृहांची किरकोळ दुरुस्ती करून स्वच्छ, नीटनेटके, निर्जंतुक दृष्टीने व्यवस्था करणे, प्रत्येक फलाटवर गावांचे मार्गदर्शक फलक, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती फलक तयार करणे. दैनंदिन स्वच्छता, सुशोभीकरण, सौंदर्यीकरण करणे.

हे सहभागी होऊ शकत नाहीअमलीपदार्थ, तंबाखू, गुटखा, मद्य तत्सम पदार्थांचे उत्पादक, सेवा करणाऱ्या संस्था, कायद्याने जाहिरात करण्यासाठी प्रतिबंधित उत्पादने, समूहांना यात सहभागी होता येणार नाही.

या स्थानकांचे पालटणार रूप‘अ’ वर्ग - कोल्हापूर, रेल्वे स्टेशन, गडहिंग्लज, गारगोटी, जयसिंगपूर, कागल, इचलकरंजी, वडगाव, रंकाळा, तर ब वर्गातील मुरगुड, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, हुपरी, हातकणंगले, संभाजीनगर, आजरा, राधानगरी आणि क वर्गातील कोडोली, वाठार, जोतिबा, शिरोळ, गगनबावडा या २४ बसस्थानकांचा समावेश आहे.

उत्कृष्ट प्रस्ताव आलेल्या उद्योग संस्थांना या २४ बसस्थानकांमध्ये वर्षभरासाठी संधी दिली जाणार आहे. इच्छुकांनी १५ दिवसांत आपले प्रस्ताव सादर करावेत. - अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, कोल्हापूर विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूर