शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

दोन वर्षांनंतर संचालक, सभासद येणार आमने-सामने; ऑनलाईन सभेमुळे सत्ताधारी होते निर्धास्त

By राजाराम लोंढे | Updated: July 27, 2022 16:40 IST

कोरोनामुळे गेली दोन वर्षे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनच घ्याव्या लागल्या.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोरोनामुळे गेली दोन वर्षे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनच घ्याव्या लागल्या. वर्षभराच्या कारभारावरून संचालकांना प्रश्नांच्या माध्यमातून धारेवर धरण्याची एकमेव संधी सभासदांना असते. ऑनलाईनमुळे गेली दोन वर्षे संस्थांतील सत्ताधारी मंडळी निर्धास्त होती. मात्र, यंदा निर्बंध नसल्याने नेहमीप्रमाणेच म्हणजे ऑफलाईन सभा घ्यावी लागणार असल्याने संचालक व सभासद समोरांसमोर येणार आहेत.राज्यात सहकारी संस्था असल्या तरी सक्षमपणे चालू असणाऱ्या संस्थांची संख्या केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच पहावयास मिळते. ‘गोकुळ’, जिल्हा बँक या दोन शिखर संस्थांनी राज्यावर छाप निर्माण केली आहे. जिल्ह्यात सर्व वर्गातील ११ हजार ८६२ संस्था कार्यरत आहेत. यातील बहुतांशी संस्था सक्षम आहेत. संस्थांच्या प्रगतीमध्ये संचालकांच्या योगदानाबरोबर सभासदांची भूमिकाही महत्त्वाची असते. येथील संस्थांचे सभासद जागरुक असल्याने संचालक मंडळाने चुकीचा निर्णय घेतला त्याला थेट विरोधही केला जातो. ज्या संस्थेचा कारभार उत्तम चालू आहे, तेथे सत्तारुढ गट वीस-पंचवीस वर्षे सत्तेत ठेवण्याची किमयाही येथील सभासद करतात. त्यामुळे सर्वसाधारण सभाही जोरात होतात.ऑनलाईनमुळे सभेस वंचितगेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. त्यामुळे बहुतांशी सभासद सभेपासून वंचित राहत होते. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने अनेकांना सहभागी होता येत नव्हते. यावर्षी संस्थांना ऑफलाईनच सभा घ्यावी लागणार असल्याने तब्बल दोन वर्षांनी संचालक व सभासद समोरासमोर येणार आहेत.

लेखापरीक्षणांची धांदल.....

केंद्र सरकारने ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर सहकारी संस्थांच्या पोटनियमात मोठ्या प्रमाणात फेरबदल केले. त्यानुसारच आर्थिक वर्ष संपल्यानंतर जुलै अखेर लेखापरीक्षण करून ऑगस्ट अखेर लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागतो. त्यामुळे सध्या संस्थांमध्ये लेखापरीक्षणाची धांदल उडाल्याचे दिसते.

अशा आहेत, सहकारी संस्थासंस्था  - संख्याजिल्हा बँक १विकास संस्था १८७७नागरी बँका ४२शिक्षक बँक २नोकरदार पतसंस्था ३४९ग्रामीण पतसंस्था ९७६नागरी पतसंस्था ३३०तालुका खरेदी विक्री संघ १६पणन  २९६साखर कारखाने १५शेतीमाल प्रक्रिया १६८उद्योग संस्था १५४सूतगिरणी २३औद्योगिक वसाहत २२ग्राहक भांडारे १८गृहनिर्माण ५३७मजूर संस्था २९७पाणीपुरवठा ४७१दूध संस्था ५०२६

टॅग्स :kolhapurकोल्हापूर