शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचा अक्षय ‘वाठार श्री’चा मानकरी

By admin | Updated: April 6, 2016 00:05 IST

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा : पुण्याचा विनित शिंदे द्वितीय; सांगलीचा प्रवीण निकम तिसरा

नवे पारगाव : वाठार (ता. हातकणंगले) येथील ‘परफेक्ट फिटनेस’च्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या खुल्या गटात ‘वाठार श्री’चा बहुमान ठाणे येथील अक्षय मोगरकर याने पटकावला. त्याला रोख ३0 हजार व शिल्ड देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी राज्यभरातून १०० शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला.स्पर्धेचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वारणेचे नेते माजी मंत्री विनय कोरे अध्यक्षस्थानी होते. स्पर्धा संयोजक वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सात गटांत ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे : ६० किलो गट : नितीन दाखले (पुणे), सोमनाथ पाल (पुणे), मोईन सुफी (पुणे), नीतेश लगडेवाले (सोलापूर), ऋषिकेश वगरे (कोल्हापूर). ६५ किलो गट : अतुल साळोखे (पुणे), फरहान सय्यद (ठाणे), महंमद बेफारी (सांगली), सचिन थोरात (सांगली), राजेंद्र जाधव (कोल्हापूर). ७० किलो गट : रूपेश चव्हाण (पुणे), मुश्रीफ खान (नाशिक), विनायक लोखंडे (ठाणे), पंचलोणार (सोलापूर), किरण शिंदे (सांगली). ७५ किलो : अजिंक्य रेडेकर (कोल्हापूर), गणेश दसारिया (औरंगाबाद), विनय धुरेत (सिंधुदुर्ग), विजय कांबळे (पुणे), योगेश पवार (कोल्हापूर). ८० किलो : विजय भोई (धुळे), विशाल कांबळे (सांगली), अकबर कुरेशी (सोलापूर), नीळकंठ सव्वाशे (सातारा), जयंत देवकुळे (सांगली). खुला गट : अक्षय मोगरकर (ठाणे), विनित शिंदे (पुणे), प्रवीण निकम (सांगली), विठ्ठल गोवेकर (सिंधुदुर्ग), कृष्णा कडाले (पुणे-पिंपरी).जिम मर्यादित गट : ‘परफेक्ट जिम श्री’ प्रमोद कुंभार, अजय सावंत, यश माने, विक्रांत कुंभार, विनोद जाधव. यावेळी राष्ट्रीय पंच बिभिषण पाटील, राहुल परीट, परफेक्ट हेल्थचे अध्यक्ष संदीप चौगुले, उपाध्यक्ष शफीक पटाईत, सचिव विनायक शेटे, खजिनदार उल्हास पाटील, जावेद कुरणे, महेश जगपात, महेश कुंभार यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)स्पर्धेदरम्यान महिला शरीरसौष्ठवपटू वाघमारे यांची प्रात्यक्षिके झाली. त्याला क्रीडारसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. वाठारसारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित केल्याने महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजकांचे कौतुक केले.