शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरकार्य बाराव्याऐवजी सातव्या दिवशी पोर्ले तर्फ ठाणे गावचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:00 IST

पोर्ले तर्फ ठाणे : माणसांच्या मरणोत्तर होणाऱ्या विधीला समाज प्रबोधनाची जोड मिळत असल्याने या प्रक्रियेतील प्रथांना फाटा मिळत आहे. त्यापैकी मूठभर रक्षा नदीत, दशविधीवेळी भांडी वाटपाची परंपरा सर्वत्र बंद केली आहे

ठळक मुद्देजिल्ह्यातील इतर गावांसमोर आदर्श, भेटवस्तू देण्याची प्रथाही बंद

पोर्ले तर्फ ठाणे : माणसांच्या मरणोत्तर होणाऱ्या विधीला समाज प्रबोधनाची जोड मिळत असल्याने या प्रक्रियेतील प्रथांना फाटा मिळत आहे. त्यापैकी मूठभर रक्षा नदीत, दशविधीवेळी भांडी वाटपाची परंपरा सर्वत्र बंद केली आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे रक्षाविसर्जन तिसºया दिवशी, तर बाराव्या दिवशी केला जाणारा दुखवटा सातव्या दिवशी घेण्याचा पायंडा गावात राबविला जातआहे.माणसांच्या मरणोत्तर रक्षाविसर्जन, खवर करणे, दशविधी, आदी प्रक्रिया विधिवत पार पाडण्यासाठी एक चौकट ठरलेली असायची. या प्रक्रियेत अमावास्या, पौर्णिमेशिवाय आणखी अडथळा निर्माण करणार दिवस आला तर या विधी मागेपुढे घेताना दुखवट्याच्या कुटुंबात मॅरेथॉन चर्चा रंगायची. त्यानंतर मरणोत्तर प्रक्रिया पूर्ण व्हायची; परंतु यातील काही प्रथांमध्ये समाजमान्यतेनुसार बदल घडवून त्याला समाज प्रबोधनाची जोड मिळाल्याने जे काही निर्णय झाले त्याला विरोध झाला नाही, हेच या संघटित भूमिकेचे यश आहे. पाणी प्रदूषणाबाबतची जनजागृती म्हणून रक्षाविसर्जन नदीच्या पाण्यात करण्याऐवजी मूठभर रक्षा नदीच्या पाण्यात सोडायची आणि उर्वरित रक्षा शेतात विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रक्षाविसर्जनादिवशी अशुभ दिवस आला तर शुभ दिवस ठरवून रक्षाविसर्जन केले जायचे. गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन, मरणोत्तर येणाºया तिसºया दिवशी कोणताही मानला जाणारा अशुभ दिवस आला तरी रक्षाविसर्जन तिसºयादिवशीच करण्याचा ठामनिर्णय घेण्यात आला.पूर्वी दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे उत्तरकार्य बाराव्या दिवशी केले जात होते; परंतु आधुनिक युगात दळणवळणाच्या व संपर्क माध्यमांच्या सोयी जलद उपल्बध होत असल्याने नातेवाइकांपर्यंत माहिती पोहोचविणे सोपे झाले आहे.त्यामुळेच बाराव्या दिवशी होणारे उत्तरकार्य पोर्लेत सातव्या दिवशी घेण्याचा पायंडा गेल्या काही महिन्यांपासून राबवून इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे.रक्षादानचा उपक्रममरणोत्तर मूठभर रक्षा नदीच्या पाण्यात व उर्वरित रक्षा शेतात मिसळली जाते; पण ज्यांचे स्वत:च्या मालकीचे शेत नाही, त्यांनी आपली रक्षा झाडे लावण्यासाठी देऊन ‘त्या’ व्यक्तीच्या स्मृती झाडाच्या रूपाने जागविल्या जातील. ते झाड जगविण्याची हमी देणारे जनजागृती डिजिटल फलक पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील स्माशानशेडमध्ये लावण्याचा उपक्रम निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी राबविला आहे.पोर्ले गावात मरणोत्तर प्रक्रियेत मरण पावलेल्या व्यक्तीची स्मृती जागविण्यासाठी भेटवस्तू वाटप करण्याची प्रथा होती. अर्थिकदृष्ट्या न परवडणाºया प्रथाही बंद करून सामान्य व गरीब कुटुंबांना यामुळे आर्थिक दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी