शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

थॅलेसेमिया रूग्णांचे कोल्हापुरात औषधाविना हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 15:45 IST

कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून थॅलेसेमिया रूग्णांचे औषधे व तपासणीविना हाल होत आहेत. त्याबाबत फाईट ॲगेन्स्ट थॅलेसमिया असोसिएशनने सीपीआर प्रशासनाकडे दुसऱ्यांदा लेखी तक्रार केली. जिल्हयात या आजाराचे २५० रुग्ण आहेत.

ठळक मुद्देथॅलेसेमिया रूग्णांचे कोल्हापुरात औषधाविना हालअसोसिएशनची तक्रार : सीपीआर प्रशासनाकडून दुर्लक्ष

कोल्हापूर : येथील सीपीआर रूग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून थॅलेसेमिया रूग्णांचे औषधे व तपासणीविना हाल होत आहेत. त्याबाबत फाईट ॲगेन्स्ट थॅलेसमिया असोसिएशनने सीपीआर प्रशासनाकडे दुसऱ्यांदा लेखी तक्रार केली. जिल्हयात या आजाराचे २५० रुग्ण आहेत.थॅलेसेमिया हा रक्ताशी निगडित गंभीर आजार असून रूग्णांच्या अंगात जन्मतःच रक्त तयार होत नाही. प्रत्येक २१ दिवसांनी रक्ताची पिशवी चढवावीच लागते. रक्त संक्रमणाने होणारे धोके टाळण्यासाठी महिन्यातून तपासणी करावी लागते. रूग्णांना रोज न चुकता औषधे घ्यावीच लागतात. त्याची मोफत औषधे फक्त जिल्हा रूग्णालयातच मिळतात पण गेल्या तीन महिन्यांपासून सीपीआर प्रशासनाकडून थॅलेसेमिया रूग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. रूग्णांचे जीवन अवलंबून आहे, अशी औषधे देण्यात टाळाटाळ होत आहे.

सीपीआरमध्ये कोल्हापूरसह कर्नाटक आणि सांगली जिल्ह्यातील रूग्णांची नावेदेखील नोंद आहेत. तिकडच्या रूग्णांचे पालक औषधे नेण्यासाठी विशेष गाडीची व्यवस्था करून येतात, पण अपघात विभागातील डॉक्टर त्यांना सीपीआरमध्ये औषधे नसल्याचे सांगून कसबा बावड्यातील सेवा रूग्णालयात पाठवतात. तिथे हेच कारण दिले जाते. हेलपाटे मारून अखेर हताशपणे रूग्णांचे पालक रिकाम्या हाती गावी परतत आहेतप्रमुख मागण्या

  • थॅलेसेमिया रूग्णांसाठी सेवा रूग्णालयात तात्पुरता स्वतंत्र वॉर्ड सुरू करा, रक्त संक्रमणाची व्यवस्था तिथेच करा
  • हिमॅटोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉ. वरूण बाफना यांची सेवा रूग्णालयात आठवड्यातून एकदा ओपीडी सुरू करा.
  • सीपीआरमध्ये थॅलेसेमिया रूग्णांसाठी भरपूर औषधे शिल्लक आहेत याची कल्पना अपघात विभागातील डॉक्टरांना द्या
  • औषधे सेवा रूग्णालयात देण्याचीही व्यवस्था करा

मग ही औषधे आली कोठून..सीपीआरमधील औषध स्टोअरमध्ये १५ थॅलेसेमिया रूग्णांच्या कार्डच्या झेरॉक्स दाखवून गोळ्यांचे बॉक्स घेऊन जाताना एक व्यक्ती बुधवारी दिसली. रूग्णाचे पालकांना गोळ्या देण्यास टाळाटाळ आणि एकाच व्यक्तीला १५ रूग्णांसाठीची औषधे दिली जातात. ती त्या रूग्णांपर्यंत पोहोचतात तरी का, याची चौकशी सीपीआर प्रशासन करावी, अशी मागणी नामजोशी यांनी केली आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर