शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘थेट पाईप’साठी ६६ कोटी वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:32 IST

तानाजी पोवार ।कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने शहराला पाणीपुरवठा करणाºया योजनेसाठी महापालिकेला आणखी किमान ६६ कोटी रकमेची जुळवाजुळव येत्या दहा महिन्यांत करावी लागणार आहे. त्यामध्ये एक्सलेशनच्या खर्चाचीही (भाववाढ) भर पडणार असल्याने या रकमेत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा परिणाम शहराच्या विकासकामावर होण्याची शक्यता वर्तविली ...

ठळक मुद्देमहानगरपालिकेवर बोजा पडणार

तानाजी पोवार ।कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने शहराला पाणीपुरवठा करणाºया योजनेसाठी महापालिकेला आणखी किमान ६६ कोटी रकमेची जुळवाजुळव येत्या दहा महिन्यांत करावी लागणार आहे. त्यामध्ये एक्सलेशनच्या खर्चाचीही (भाववाढ) भर पडणार असल्याने या रकमेत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा परिणाम शहराच्या विकासकामावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अगोदरच आर्थिक अडचणीत असणाºया कोल्हापूर महानगरपालिकेवर हा बोजा पडणार आहे. या योजनेचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालल्याने तो महापालिकेसमोर चिंतेचा विषय बनला आहे.कोल्हापूरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारी थेट पाईपलाईन योजना दिवसेंदिवस वादाच्या भोवºयात अडकत आहे. विविध परवानग्या घेताना अनेक अधिकाºयांची दमछाक झाली. आता काम सुरू केल्यापासूनच या योजनेवर राजकीय सावट पडले होते. त्यानंतर ठिकपुर्ली येथील पुलाचा खर्च लाखात करूनही तो कोटीत दाखविल्याच्या गैरप्रकारामुळे ही योजना चांगलीच चर्चेत आली. त्यावर युनिटी कन्सल्टंट कंपनी, जीकेसी ठेकेदार कंपनी यांच्याकडून खुलासा समाधानकारक न आल्यामुळे आयुक्तांनी ही खर्चाची रक्कम वसूल केली. त्यामुळे या योजनेच्या कामात जीकेसी ठेकेदार कंपनी, युनिटी कन्सल्टंट कंपनी यांच्यासोबत महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोप केला जात आहे.या अवस्थेत सुमारे ४२५ कोटींच्या योजनेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ६०:२०:२० टक्के या मंजूर फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकारकडून सुमारे २५५ कोटी, तर राज्य सरकारकडून ८४ कोटी मिळणार आहेत. महापालिकेला सुमारे ८४ कोटी रुपये तसेच निविदा मंजूर प्रक्रियेवेळच्या ६५ कोटींपेक्षा जादा असा एकूण १४९ कोटी रुपयांचा आपला हिस्सा उचलावा लागला आहे. त्यापैकी महापालिकेने १३ कोटींचा पहिला हप्ता जमा केला आहे, तर शासनाकडून १४ व्या वित्त आयोगाकडून आलेली सुमारे १० कोटींची रक्कमही या योजनेसाठी परस्पर वळविण्यात आली आहे. उर्वरित १२६ कोटी रुपयांपैकी ६० कोटी ‘हुडको’ने कर्ज दिले आहे. त्यामुळे उर्वरित ६६ कोटी रुपयांसाठी आता महापालिकेला हात हलवावे लागणार आहेत. दरम्यान, या योजनेत एक्सलेशन खर्चात (भाववाढ) वाढ झाल्यास त्याचाही अतिरिक्त बोजा महापालिकेला सोसावा लागणार आहे.या कामाबाबत ठेकेदार कंपनीला दिलेली मुदत नोव्हेंबर २०१६ मध्येच संपली असल्याने त्यांना आणखी दीड वर्ष म्हणजे मे २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यावेळी वाढीव मुदतीत कंपनीला दरमहा सुमारे दीड लाख रुपये दंड भरावा लागत आहे. त्यामुळे मे २०१८ या मुदतीपूर्वी महापालिकेला आपल्या हिश्श्याची ६६ कोटींची जमवाजमव करावी लागणार आहे.जीवन प्राधिकरणाकडून मार्गदर्शन घेणार : आयुक्तथेट पाईपलाईन योजनेच्या काळम्मावाडी येथील जॅकवेलच्या कामाच्या वाढत्या खर्चामुळे नवी चिंता निर्माण झाली असून, मंजूर खर्चापेक्षा जादा खर्च हा महापालिकेने करण्याची तरतूद करारामध्ये आहे, पण एक्सलेशन खर्चही महापालिकेची डोकेदुखी ठरू लागला आहे. हा एक्सलेशन खर्च (संभाव्य भाववाढ) करायचा कोणी? याबाबत महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून मार्गदर्शन मागविले जाईल, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.‘युनिटी’चा वाढता खर्च डोकेदुखीमहापालिकेच्या यापूर्वीच्या योजनांवर कन्सल्टन्सी म्हणून महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे काम दिले होते. त्यापैकी अमृत योजनेचे काम अद्याप सुरू आहे. त्यासाठी प्राधिकरणाला३ टक्के देण्यात येतात, तर थेट पाईपलाईन योजनेचे काम जीवन प्राधिकरणाला दिले असते तर त्या कामापोटी १४ कोटी रुपये कन्सल्टन्सी द्यावी लागली असती, पण हे काम युनिटी कन्सल्टन्सीला ०.५२ टक्के इतक्या दराने देण्यात आले, पण या योजनेवर दिवसेंदिवस वाढणारा खर्च ‘युनिटी’बाबत विचार करायला लावणारा आहे, तर तो काही अधिकाºयांसाठी ‘मलिदा’, तर काहींसाठी डोकेदुखी ठरत आहे.