शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कामगारांचा प्रभाव असणारी वस्त्रोद्योगनगरी

By admin | Updated: October 7, 2014 00:46 IST

शहरी, ग्रामीण मिलाप : कॉँग्रेसचा प्रभाव, तरीही अपवादात्मक धक्के

राजाराम पाटील - इचलकरंजीइचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेतंर साधारणत: ८० टक्के शहरी आणि २० टक्के ग्रामीण मतदारसंघ झाला. कबनूर व कोरोची गावांचे स्वतंत्र अस्तित्व असले, तरी इचलकरंजीतील वसाहती आणि या दोन्ही गावांचा वाढीव परिसर परस्परांत मिसळल्याने शहरातील राजकीय परिणामांचे पडसाद तेथेही उमटतात. गत निवडणुकीत जिल्ह्यात प्रथमच भाजपचे कमळ इचलकरंजीत उमलले. सध्या भाजप, शिवसेना, राष्ट्रीय व राष्ट्रवादी असे चारही उमेदवार निवडणुकीत असल्याने कमालीची चुरस आहे. मतदारसंघावर कॉँग्रेसचेच वर्चस्व आहे. बाबासाहेब खंजिरे, दत्ताजीराव कदम, कल्लाप्पाण्णा आवाडे यांचाच प्रभाव आहे. तरीही दोनवेळा माकपने आणि भाजपने बाजी मारली. शहरासह पाच गावांच्या परिसरात कुंभार व माने गटांचेही अस्तित्व आहे. येथे कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानीची आता लक्षणीय ताकद आहे. कष्टकरी ते कोट्यधीशइचलकरंजीतील झोपडपट्ट्यांमध्ये कष्टकरी, रोजंदारी, मोलमजुरी करणारा कामगार, तर महावीर कॉलनी, महेश कॉलनी आणि करोडपती कॉलनीमध्ये कोट्यधीशांची वस्ती आहे.मतदारसंघाची रचनाइचलकरंजी नगरपालिका क्षेत्र, चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी, तारदाळ यामध्ये तालुका पंचायतीचे चार पूर्ण मतदारसंघ आणि रेंदाळ तालुका पंचायतीतील चंदूर हे एकच गाव समाविष्ट आहे.मतदारसंघातील समस्याइचलकरंजी वस्त्रोद्योगाचे शहर असल्याने येथे वीज, रस्त्यांबरोबर स्वच्छ व पुरेशा पाण्याची आवश्यकता. पाण्याचा प्रश्न ग्रामीण परिसरासही भेडसावतो आहे. शहरालगत झोपडपट्ट्या वाढत असल्याने घरकुलांची समस्या.शहापूर ठाण्याला पोलीस हवेतवस्त्रोद्योगात वाढती गुंडगिरी ही मोठी समस्या आहे. तसेच काही विभागात फाळकूटदादांची गुंडगिरी असल्याने विशेषत: नव्यानेच झालेल्या शहापूर पोलीस ठाण्याला आवश्यक अशा पुरेशा कर्मचारी वर्गाची उणीव आहे.वस्त्रोद्योग आणि साखर कारखानाहीवस्त्रनगरी असल्याने सहकार क्षेत्रातील सूतगिरण्यांचा प्रभाव असला, तरी पंचगंगा सहकारी साखर कारखाना मतदारसंघात आहे. कारखान्यावर पूर्वाश्रमीच्या कुंभार गटाची सत्ता असून, अध्यक्ष पी. एम. पाटील यांचाही गट कबनूरसह ग्रामीण भागात कार्यरत आहे. सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅँकांबरोबर खासगी बॅँकांचेही मोठे जाळे इचलकरंजीत आहे.राष्ट्रवादीत फाटाफूटसात नगरसेवक मदन कारंडेंसोबत, ३ नगरसेवक आवाडेंकडे, १ नगरसेवक भूमिका गुलदस्त्यात‘शविआ’मध्ये फाटाफूट१२ नगरसेवक हाळवणकरांकडे२ नगरसेवक जाधवांबरोबर४ नगरसेवक कॉँग्रेसच्या आवाडेंकडेनगरसेवकांची वर्गवारीकॉँग्रेस २, राष्ट्रवादी ११शहर विकास आघाडी १७कॉँग्रेसचे सर्व २९ नगरसेवक प्रकाश आवाडेंबरोबर. याशिवाय ‘शविआ’मधील चौघेजण कॉँग्रेसमध्ये आले असून, आणखी आवाडेंच्या सोबत येण्याची शक्यता.