शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी, सेट पेपर फोडणाऱ्या रॅकेटला दणका; प्रथमच मोठी कारवाई, आरोपींची संख्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 09:01 IST

काही शिक्षण संस्थांमधील भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी आपले नातेवाईक, पै-पाहुणे आणि लाखो रुपये देण्याची ऐपत असलेल्या उमेदवारांना हेरून पेपरफुटीचे रॅकेट चालवल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.

उद्धव गोडसे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि प्राध्यापक पात्रता परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी रॅकेट उद्ध्वस्त केले. प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्यांचा शोध सुरू असून, पेपरफुटीचा लाभ घेतलेले उमेदवारही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. तपासातून काही संस्थाचालकांच्या सहभागाचे धागेदोरे मिळाल्याने या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काही शिक्षण संस्थांमधील भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी आपले नातेवाईक, पै-पाहुणे आणि लाखो रुपये देण्याची ऐपत असलेल्या उमेदवारांना हेरून पेपरफुटीचे रॅकेट चालवल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून अतिशय गोपनीय पद्धतीने सुरू असलेल्या पेपरफुटीची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सुरुवातीला नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. याप्रकरणात कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून २७ आरोपींना अटक केली असून चौकशीतून ठोस पुरावे हाती लागताच पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

लाभार्थीही होणार आरोपी

पोलिसांनी अटक केलेल्या काही विद्यार्थ्यांनी एजंटांकडून प्रश्नपत्रिका मिळाल्याची कबुली दिली आहे.

पेपरफुटीचा लाभ घेऊन पात्र ठरलेल्या आणि सध्या शिक्षक, प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या लाभार्थ्यांची यादी पोलिसांना मिळाली आहे.

काही लाभार्थीही आरोपी होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काही संस्थाचालकांचा सहभाग

काही संस्थाचालक एजंटांच्या संपर्कात होते. त्यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यात कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील काही संस्थाचालकांचा सहभाग आहे.

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

पेपर फुटीप्रकरणी दक्षिण महाराष्ट्रात प्रथमच मोठी कारवाई झाली. गुन्ह्याचा केवळ उलगडा करून पोलिस थांबलेले नाहीत, तर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. विद्यार्थ्यांसोबत एजंट, शिक्षक, प्राध्यापक आणि काही संस्थाचालकही कारवाईच्या टप्प्यात आल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : TET, SET Paper Leak Racket Busted; Major Action, More Arrests Likely

Web Summary : Police dismantled a TET/SET paper leak racket in Kolhapur, arresting 27. Beneficiaries and institution heads are implicated. This unprecedented action in southern Maharashtra has caused an uproar in the education sector as investigations continue and the scope widens.