शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

करंजगाव येथील जवानाचा आसाममध्ये मत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 22:12 IST

करंजगाव ( ता. चंदगड) येथील १७ मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान नितेश महादेव मुळीक (वय २८) याचा आसाममध्ये सेवा बजावत असताना मत्यू झाला. ही घटना बुधवार दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या दुःखद घटनेची माहिती त्याचे वडील महादेव मुळीक यांना लष्कर सेवेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी उशिरा कळवली.

चंदगड -  करंजगाव ( ता. चंदगड) येथील १७ मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान नितेश महादेव मुळीक (वय २८) याचा आसाममध्ये सेवा बजावत असताना मत्यू झाला. ही घटना बुधवार दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या दुःखद घटनेची माहिती त्याचे वडील महादेव मुळीक यांना लष्कर सेवेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी उशिरा कळवली. त्यामुळे करंजगावसह चंदगड तालुका शोकसागरात बुडाला आहे.आसाम येथील सीमेवर नितेश हे सेवा बजावत होते. त्याचा बुधवारी मत्यू झाला. नितेशचे वडील महादेव मुळीक हे सैन्यातून निवत्त झाल्यावर २०१४ साली तो १७ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल झाला होता. त्याचे माध्यमिक शिक्षण करंजगावात तर उच्च माध्यमिक शिक्षण हलकर्णी येथे झाले होते. काही दिवसापूर्वी तो सुट्टीवरही आला होता. आपली पत्नी गरोदर असून तिच्या बाळतंणात सुट्टीवर येतो असे सांगूनही तो गेला होता. पण या घटनेमुळे त्याची ती इच्छा ही अपुरी राहीली. बुधवारी सायंकाळी नितेशच्या निधनाचा निरोप समजताच कुंटुबियांनी एकच हबंरडा फोडला. गुरुवारी त्यांच्या सांत्वनासाठी नातेवाईक तसेच तालुक्यातील अनेक लोकांनी भेट घेतली.    नितेश मुळीक यांचे पार्थिव शुक्रवारी बेळगाव जवळील सांबरा येथील विमानतळावर आणण्यात येणार आहे. तेथे त्यांच्या युनिटच्यावतीने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पार्थिव करंजगावात आणले जाणार आहे. करंजगाव येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ग्रामस्थांनी नितेशच्या  अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरू ठेवली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. त्याची पत्नी सहा महिन्यांची गरोदर आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, काका, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर