शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग खुली, सौंदर्याने प्रवासी भारावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 15:23 IST

कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेली आणि गेल्या १० मार्चला उद्घाटन झालेली कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग शुक्रवारी प्रवाशांसाठी खुली ...

कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेली आणि गेल्या १० मार्चला उद्घाटन झालेली कोल्हापूरविमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग शुक्रवारी प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. सर्वसुविधांयुक्त, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या या बिल्डिंगचा ऐतिहासिक लूक पाहून प्रवासीही भारावून गेले. यावेळी विमानतळ प्राधिकरण प्रशासनाकडून प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत टर्मिनल बिल्डिंग उभी करण्यात आली. गेल्या साडेचार वर्षांपासून या बिल्डिंगचे काम सुुरू होते. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत उभारलेल्या या बिल्डिंगचे १० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले. मात्र, काही किरकाेळ कामे राहिल्याने तिचा वापर सुरू नव्हता.विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर पोलिस यांच्याकडून तयारी झाल्यानंतर विमान कंपन्यांनीही प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी सकाळी नव्या टर्मिनल बिल्डिंगमधून सेवा देण्यास सुरुवात केली. यावेळी आलेल्या प्रवाशांचे विमानतळ प्राधिकरण संचालक अनिल शिंदे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

तिकीट बुकिंगसाठीही गर्दीसद्य:स्थितीला टर्मिनल बिल्डिंगमध्ये स्टार एअर कंपनीचे तिकीट काैंटर सुरू आहे. प्रवाशांनी नव्या बिल्डिंगमधील या काऊंटरवरही गर्दी केली.

कडेकोट सुरक्षा व्यवस्थानव्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये कोल्हापूर पोलिसांसह ७५ सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. प्रवेशित व बाहेर जाण्याच्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

 पाच तपासणी काैंटर सुरूबिल्डिंगमध्ये १० तपासणी काैंटर आहेत. यापैकी सध्या ५ सुरू करण्यात आली. त्यात स्टार एअरचे दोन तर इंडिगोच तीन आहेत.

तिरुपतीचे बुकिंग फुल्लयेत्या ३१ मार्चपासून कोल्हापूर-तिरुपती ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या विमान सेवेचे पुढील महिनाभराचे तिकीट फुल्ल झाले आहे. ही सेवा पूर्ववत सुरु होणार असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

काय सुरू झाले-बिल्डिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम-ॲड्रेस सिस्टीम-इन्फॉर्मेशन बोर्ड (माहिती फलक )-व्हीआयपी लाऊंज

नवी टर्मिनल बिल्डिंग सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी जोडलेली आहे. त्यामुळे प्रवासीही समाधानी आहेत. सध्या प्रवाशांचा प्रतिसादही खूपच चांगला आहे. - नंदकुमार गुरव, व्यवस्थापक, स्टार एअर, कोल्हापूर विमानतळ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ