शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग कधी खुली होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 17:58 IST

इमारत पूर्ण होण्यासाठीच साडेचार वर्षांचा कालावधी गेला

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरील ऐतिहासिक लूकची टर्मिनल बिल्डिंग गेली चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास गेली असली तरी कंपन्यांच्या दिरंगाईमुळे ही बिल्डिंग खुली होण्यास आता वेळ लागत आहे. ही इमारत पूर्ण होण्यासाठीच साडेचार वर्षांचा कालावधी गेला आहे. आता पूर्ण होऊनही प्रवाशांना त्याची सेवा मिळत नसल्याने बिल्डिंगच्या दिरंगाईचे रुतलेले चाक कधी बाहेर निघणार, असा सवाल उपस्थित होत आहे.कोल्हापूर विमानतळावर विस्तारीकरणांतर्गत ७२ कोटी रुपयांच्या निधीतून टर्मिनल बिल्डिंग उभारण्यात आली. या बिल्डिंगला जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचा लूक देण्यात आला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेल्या या टर्मिनल बिल्डिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० मार्चला ऑनलाइन पद्धतीने उदघाटन करण्यात आले. मात्र, काही किरकोळ कामे राहिली असल्याने ही बिल्डिंग खुली केली नव्हती. ही कामे पूर्ण झाल्यानंतर आज गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार होती. यासाठी विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर पोलिस यांनी पूर्ण तयारीही केली. मात्र, विमान कंपन्यांकडूनच दिरंगाई होत असल्याने आजचा गुरुवारचा मुहुर्त हुकला आहे. दोन्ही कंपन्यांनी अद्याप बिल्डिंगमध्ये कार्यालये सुरू केली नाहीत. त्यांचे स्लॉट ठरविलेले नाहीत. त्यामुळे ही बिल्डिंग कार्यान्वित करण्यास उशिर होत आहे.

टर्मिनल बिल्डिंगमध्ये काय-एकावेळी ३०० प्रवाशांची सोय-१९० कार पार्क करता येतील अशी सुविधा-एक व्हीआयपी लाउंज

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ