शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटली मराठा वसतिगृहाचा प्रश्न : संस्थांकडून अर्जांची मागणी; विद्यार्थ्यांना सुविधांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:23 IST

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे.

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे. राज्य शासनातर्फे मार्गदर्शक सूचना उशिरा मिळाल्याने वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक संस्थांच्या अर्ज मागणीची प्रक्रिया दि. २४ जुलैपासून सुरू झाली आहे. .

विचारेमाळ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीची दुरुस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली. मराठा समाजातील ७२ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या वसतिगृहामध्ये होणार आहे. पालकमंत्री पाटील यांनी दि. २६ जून रोजी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या वसतिगृहाचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाईल. दि. २६ जुलैपर्यंत या वसतिगृहामध्ये मुले प्रत्यक्षपणे राहण्यास येतील, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली.

आतापर्यंत ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्णांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, स्वयंसेवी संस्था नियुक्ती करण्याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना मिळण्यास विलंब झाला; त्यामुळे संस्थांकडून अर्र्ज मागविण्याची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शिष्यवृत्तीपाठोपाठ आता वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.नोंदणीकृत संस्थांना सोमवारपर्यंत मुदतकोल्हापुरातील विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. या वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिवपदी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांची नियुक्ती शासनाने केली आहे. संबंधित वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदस्य सचिवांकडे नोंदणीकृत संस्थांनी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार (दि. ३०) पर्यंत आहे. दरम्यान, किती संस्थांचे अर्ज दाखल झाले, वसतिगृहाची सुरुवात कधीपासून होणार, याची माहिती जाणून घेण्यासाठी सदस्य सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. 

राज्य सरकारने मराठा समाजासाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत अशा योजना जाहीर केल्या; पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी योग्य कार्यवाही केली नाही. त्यामुळे संबंधित योजना फसव्या ठरत आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह योग्य पद्धतीने आणि किमान १० आॅगस्टपर्यंत तरी सुरू करावे.- ऋतुराज माने, विद्यार्थी नेते

टॅग्स :kolhapurकोल्हापूर