कसबा बावडा : ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे अस्तित्वात आलेल्या नवीन सहकार कायद्यामुळे अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता एक वर्षाऐवजी पाच वर्षांचा झाला आहे. तसेच सर्वच सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहेत. ९७ व्या घटनादुरुस्तीपूर्वी सर्वच सहकारी संस्थांना आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा १४ आॅगस्टपूर्वी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, नवीन कायद्यानुसार त्यांना आता तब्बल दीड महिन्यांची वाढ म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. तसेच लेखापरीक्षण ३१ जुलैपर्यंत करून घेण्यास परवानगी दिली आहे. लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थांना लेखापरीक्षक निवडण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. याशिवाय पूर्वीचा अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ वाढवून तो आता पाच वर्षे करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी अध्यक्ष बदल होत होता. मात्र, आता एकदा निवडलेला अध्यक्ष सलग पाच वर्षे या पदावर राहू शकतो.
सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता पाच वर्षांचा
By admin | Updated: July 12, 2014 00:41 IST