शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शाहू छत्रपती समर्थक व शिंदेसेना पदाधिकाऱ्यांमधील घोषणांनी तणाव, शाहू छत्रपतींवरील टीकेचे पडसाद

By राजाराम लोंढे | Updated: April 13, 2024 17:12 IST

पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपती यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले असून, शाहू छत्रपती यांचे समर्थक व शिंदेसेना पदाधिकारी उत्तरेश्वर पेठ चौकात एकत्र आल्याने शनिवारी तणाव निर्माण झाला. अचानक घडलेल्या प्रकाराने वाहतूक ठप्प झाली होती, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले.खासदार मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्याचे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत. शनिवारी सकाळी उत्तरेश्वर पेठ येथे शाहू छत्रपती समर्थक एकत्र आले होते. त्यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यासाठी शिंदेसेनेचे पदाधिकारी जात होते. काँग्रेस समर्थकांनी शाहू छत्रपती यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

शिंदेसेनेचे पदाधिकारी त्याच चौकात थांबले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संजय मंडलिक यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, या मार्गावरून जाणारी वाहने थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना तेथून घालवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणsanjay mandlikसंजय मंडलिकShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती