शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

‘पाणीपुरवठा’च्या निविदा नियमबाह्य

By admin | Updated: February 13, 2015 23:48 IST

जिल्हा परिषद सभा : सदस्यांचा गौप्यस्फोट, धैर्यशील मानेंनी काढले प्रशासनाचे वाभाडे

कोल्हापूर : जिल्ह्णातील शंभरांवर गावांच्या लाखो रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांच्या निविदा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने नियमबाह्णपणे काढल्या आहेत. ज्या गावांच्या निविदा निघाल्या आहेत, त्यांचे सरपंच, ग्रामसेवक, अन्य पदाधिकारी यांना अंधारात ठेवले आहे, असा गौप्यस्फोट धैर्यशील माने यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. कडक शब्दांत वाभाडे काढत त्यांनी प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा केला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष विमल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)अविनाश सुभेदार यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.माने म्हणाले, पाणीयोजनेच्या कामाची निविदा काढताना पाणीपुरवठा विभागाने शासनाचे सर्व नियम डावलले आहेत. चंदगड तालुक्याच्या गावातील निविदा आजरा तालुक्यातील ग्रामपंचायतीने काढली आहे. निविदा काढताना संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना सामावून घ्यावे, असा शासनाचा नियम आहे. असे असताना ग्रामपंचायतीला अंधारात ठेवले आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर तक्रार झाल्यानंतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तक्रार झाल्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना पुढे केले जाते आणि वरिष्ठ सहीसलामत सुटतात; त्यामुळे नियमबाह्ण निविदेची बाब गंभीर आहे.आजऱ्याचे सभापती विष्णुपंत केसरकर म्हणाले, आमच्या तालुक्यातील पाणीयोजनेच्या निविदा चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी काढल्याचे आता ऐकून दु:ख होते. फेरनिविदा काढाव्यात. राहुल देसाई म्हणाले, निविदा ग्रामपंचायती काढत नसून ठेकेदार काढत आहेत. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा काय करीत आहे? पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एन. बी. भोई यांनी केवळ दोन ते तीन गावांतच असे झाले आहे, असे उत्तर देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेणाऱ्या संस्थेतील सर्वच शिक्षकांचे पगार थांबवावेत, अशी मागणी एकनाथ पाटील यांनी केली. शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी ९१ शिक्षकांना सामावून घेतलेले नाही. संबंधित संस्थांना नोटीस काढली आहे. शासनाच्या नियमानुसार कारवाई होईल, असे सांगितले. अरुण इंगवले म्हणाले, शासनाने निश्चित केलेल्या कंपनीच्या सायकली स्वनिधीतून दिल्या जातात. त्या निकृष्ट दर्जाच्या असतात. त्यामुळे नामांकित कंपनीच्या सायकली लाभार्थ्याला द्याव्यात, अन्यथा रोख पैसे द्यावेत. यावर मुख्य लेखाधिकारी गणेश देशपांडे यांनी नियमानुसार शासनाने निश्चित केलेल्या कंपन्यांच्याच सायकली घेणे बंधनकारक आहे, असे सांगितले. शेवटी सीईओ सुभेदार यांनी तोडगा काढला. ते म्हणाले, दोन ज्येष्ठ सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची समिती स्थापन करून कोणत्या कंपनीच्या सायकली घ्यायच्या, हे निश्चित केले जाईल.केजरीवालांचेही अभिनंदन...दिल्लीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणारे अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यासाठी माने उठले. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही सदस्य हसलेही. याचा वेध घेत सर्वसामान्य असे केजरीवाल यांनी निवडणुकीत चांगले यश मिळविले तर अभिनंदन का करायचे नाही? असाही मिश्किल टोलाही माने यांनी लगावला.सभागृहाचे उद्घाटनविस्तारीकरण आणि नूतनीकरण झालेल्या सभागृहाचे उद्घाटन अध्यक्षा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिकारी व सदस्य उपस्थित होते.