शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:11 IST

कोल्हापूर : येथील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यास महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली ...

कोल्हापूर : येथील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यास महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली आहे. तीन कोटी २२ लाख रुपये खर्चाची दुसऱ्या टप्प्यातील कामेही गतीने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महापालिकेच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देताच ही निविदा जाहीर केली जाणार आहे.केशवराव भोसले नाट्यगृहाला दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १० वाजता भीषण आग लागून नाट्यगृहाचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. नाट्यगृहाचे छत पूर्णपणे जळाले होते, मजबूत भिंतीना तडे गेले होते. त्यानंतर जनतेतून झालेल्या मागणीनुसार हे नाट्यगृह ‘जसे होते तसे’ बांधण्याचा निर्णय महापालिका तसेच राज्य सरकारने घेतला होता. नाट्यगृहाचा विषय अतिशय संवेदनशील असल्याने त्याच्या पुनर्बांधणीला २५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यातील नाट्यगृहाच्या दगडी भिंती काही अंतरापर्यंत उतरवून पुन्हा बांधणे आणि इमारतीचे संवर्धन अशा सात कोटींच्या कामांचा समावेश होता. ही कामे गतीने सुरू असून, दुसऱ्या टप्प्यातील कामेही अशाच गतीने सुरू व्हावीत म्हणून त्याची निविदा काढण्यास प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली. दुसऱ्या टप्प्यातील तीन कोटी २२ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता झाल्यावर लगेच निविदा जाहीर केली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील कामे 

  • तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर ग्रीन रूम उभारणे
  • इमारतीच्या बाजूच्या पॅसेजमध्ये रूफिंग करणे
  • खासबाग मैदानाकडील स्टेज तयार करणे
  • फ्लोरिंग करणे, अशा कामांचा समावेश आहे 

१२ गुंठे जागा ताब्यात घेणारनाट्यगृहाच्या दक्षिण बाजूस असलेली महापालिकेची १२ गुंठे जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील आठ गुंठे जागा तालीम संघाला देण्यात आली होती. तर अन्य चार गुंठे जमिनीवर चौदा दुकानदारांनी अतिक्रमण करून जागा व्यापली होती. या सर्वांना नोटिसा लागू करण्यात आल्या असून, ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुढील आठ ते दहा दिवसांत पूर्ण होईल, असे इस्टेट अधिकारी विलास साळोखे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर