शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्याप्रकरणी दहा संशयितांवर दोषनिश्चिती; पुढील सुनावणी २३ जानेवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:23 IST

खटल्याच्या सुनावणीला गती

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या केल्याप्रकरणी कोल्हापुरात जिल्हा न्यायाधीश (तिसरे) एस. एस. तांबे यांच्यासमोर सोमवारी दहा संशयितांवर दोषनिश्चिती करण्यात आली. यात समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश आहे. दोषनिश्चिती झाल्यामुळे पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार असून, पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.

पुढील सुनावणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. संशयितांवर दोषनिश्चिती झाल्यामुळे खटल्याच्या कामकाजाला गती येईल, असा विश्वासही ॲड. राणे यांनी व्यक्त केला. अटकेतील दहा संशयितांपैकी सहा संशयित बंगळुरू येथील कारागृहात होते, तर तीन संशयित पुण्यातील येरवडा कारागृहात होते. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. समीर गायकवाड याला यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे.

दहा संशयित हजर

समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (४८, रा. पनवेल मुंबई), अमोल रवींद्र काळे (३४, रा. पिंपरी, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. जळगाव), भरत जयवंत कुरणे (३७, रा. संभाजी गल्ली, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. कळणे, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (२५, रा. दौलताबाद, औरंगाबाद), सचिन प्रकाश आंदुरे (३२, रा. राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, हुबळी धारवाड), गणेश दशरथ मिस्कीन (३०, रा. चैतन्यनगर, धारवाड) हे संशयित न्यायालयात हजर होते. वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.

१२ संशयितांवर दाखल होता गुन्हा

गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर एसआयटीने तपास करून १२ संशयितांवर गुन्हा दाखल केला. एसआयटीच्या तपासानंतर हा गुन्हा एटीएसकडे वर्ग करण्यात आला असून, एटीएसकडूनही तपास सुरू आहे. न्यायाधीश तांबे यांनी सर्व संशयितांना आरोपांबद्दल विचारणा केली. मात्र, सर्व संशयितांनी आरोप मान्य नसल्याचे सांगितले. 

दहा संशयित हजर

समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (४८, रा. पनवेल मुंबई), अमोल रवींद्र काळे (३४, रा. पिंपरी, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. जळगाव), भरत जयवंत कुरणे (३७, रा. संभाजी गल्ली, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. कळणे, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (२५, रा. दौलताबाद, औरंगाबाद), सचिन प्रकाश आंदुरे (३२, रा. राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, हुबळी धारवाड), गणेश दशरथ मिस्कीन (३०, रा. चैतन्यनगर, धारवाड) हे संशयित न्यायालयात हजर होते. वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.

आरोप नाकबूल

न्यायाधीशांनी आरोपांबद्दल विचारणा करताच सर्व संशयितांनी आरोप नाकबूल केला. सुनावणीच्या सुरुवातीला संशयितांचे वकील समीर पटवर्धन उपस्थित नव्हते. त्यामुळे काही संशयितांनी वकिलांशी चर्चा करून दोषनिश्चितीच्या कागदांवर सही करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी न्यायाधीशांकडे केली. २० मिनिटांनी ॲड. पटवर्धन आल्यानंतर त्यांच्याशी संशयितांची चर्चा झाली. त्यानंतर संशयितांनी दोषनिश्चितीच्या कागदावर सह्या केल्या. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर