शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राऊतवाडी धबधबा पाहण्यास मोजावे लागणार पैसे, हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर करडी नजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 14:27 IST

माफक प्रवेश शुल्क मोजावे लागले तरी सुविधा उपलब्ध झाल्याने महिलांना धबधब्याचा आनंद घेता येणार

राधानगरी : राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक राधानगरी तालुक्यातील राऊतवाडीला भेट देत आहेत. तालुक्यातील खास आकर्षण असणाऱ्या राऊतवाडी धबधबा येथे आमदार प्रकाश आबिटकर व वन्यजीव विभागाच्या प्रयत्नांतून पर्यटन विकास निधीतून स्वागत कमान, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम, स्वछतागृह, वनकर्मचारी व पोलिसांसाठी चौकी, संरक्षक कठडा आदी विकासकामे केली आहेत. त्यामुळे या वर्षी प्रथमच धबधबा पाहण्यासाठी माफक प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.ग्राम परिस्थिती विकास समितीमार्फत लहान मुलांना पाच रुपये व महिला व पुरुष यांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. या मिळालेल्या निधीतून धबधबा परिसर स्वच्छता, प्लास्टिक व इतर कचरा गोळा करणे, दुरुस्ती व देखभाल, स्वच्छतागृहात विजेची सोय, ग्राम परिस्थिती विकास समितीच्या वतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार आदींचा समावेश असणार आहे. तसेच पार्किंगसाठी मोटारसायकल १० रुपये व चारचाकी वाहनास २० रुपये आकारण्यात आले आहेत.धबधबा ठिकाणी अनेक तरुणांकडून हुल्लडबाजी केली जाते. पण, आता वनकर्मचारी तसेच पोलिस चौकी उभा केल्याने पोलिस व वनकर्मचारी यांची हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर करडी नजर राहणार आहे. माफक प्रवेश शुल्क मोजावे लागले तरी सुविधा उपलब्ध झाल्याने महिलांना धबधब्याचा आनंद घेता येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन