शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

तब्बल दहा टक्के लाभार्थी बोगस

By admin | Updated: March 16, 2015 00:07 IST

संजय गांधी निराधार योजना : शासनाचे चौकशीचे आदेश; तीन महिन्यांची मुदत

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत राज्यातील २६ जिल्ह्यांत वर्षात दहा टक्क्यांपेक्षा अधिक लाभार्थी बोगस असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी ‘लक्ष्य’ करण्यात आले आहे. विशेष पथकाद्वारे तीन महिन्यांत सविस्तर तपासणी करावी, असा आदेश शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने दिला आहे. त्यानुसार कोल्हापूरसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांची तपासणी सुरू झाली आहे. गरीब, दुर्बल, कमकुवत लोकांचे जगणे सुसह्ण करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय, विशेष साहाय्य विभागाकडून पात्र लाभार्थ्यांना दरमहा अर्थसाहाय्य केले जाते. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ, आम आदमी विमा या यातील योजना आहेत. जिल्हास्तरावरून महसूल उपजिल्हाधिकारी, तर गावपातळीवर तलाठ्यांतर्फे या योजनांची अंमलबजावणी होते.अलीकडे राजकीय हस्तक्षेपातून स्थानिक यंत्रणेला हाताशी धरून अपात्र लोक लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ५ डिसेंबर २०१४ पासून अपात्र लाभार्थ्यांची शोधमोहीम सुरू केली. गडहिंग्लज, कागल तालुक्यांत बोगस लाभार्थी सापडले. चौकशीच्या ससेमिऱ्याला कागल तालुक्यातून तीव्र विरोध झाला. ‘महसूल’कडे असलेल्या अन्य कामांचा ताण व विरोध यांमुळे तपासणी मोहीम पूर्ण होऊन बोगस लाभार्थी किती, हे निश्चित झाले नाही. दरम्यान, शासनाने २०१२-१३ या वर्षापेक्षा २०१३-१४ या वर्षात दहा टक्के लाभार्थी वाढलेल्या कोल्हापूरसह राज्यातील २६ जिल्ह्णांतील लाभार्थ्यांची तपासणी करण्याचा सूचना शासनाने स्वतंत्र शासन आदेश काढून दिल्या आहेत. यामुळे पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील अध्यक्षतेखाली व सहायक संचालक, तहसीलदार सदस्य असलेल्या विशेष पथकाद्वारे तपासणी सुरू झाली आहे.काही जिल्ह्यातील २०१२-१३ चे आणि कंसात २०१३-१४ चे लाभार्थी असे : कोल्हापूर - २१२१३ (२६८७६), सांगली - ४४०६ (१९०३७), सातारा - १३५१२ (१७१८०), अहमदनगर - १७७४१ (१९६६५), अकोला - १७४८१ (२३४१८), अमरावती - ३०८८८ (३६४१२), औरंगाबाद- १९०६४ (२११६७), बीड- २१४९८ (२४८१०), भंडारा - १७११५ (१९६५२), बुलढाणा- २६००९ (३१६१८), गडचिरोली- ११४४५ (१४३४३), गोंदिया- १४२८५ (१६०४१), जळगाव- २४१०३ (३०४९५)दहा टक्क्यांपेक्षा अधिक लाभार्थी वाढीव असलेल्यांत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात काही लाभार्थ्यांची चौकशी केली आहे. शासनाने अधिकृतपणे आदेश दिल्यामुळे सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना पुन्हा तपासणीचे आदेश दिले आहेत.- किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)