शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

टेम्पो उलटून १४ विद्यार्थी जखमी

By admin | Updated: November 21, 2014 00:54 IST

सहाजण गंभीर : विद्यार्थी दोडामार्ग तालुक्यातील; गोवा साखळीत दुर्घटना

दोडामार्ग/ होंडा (ता. सत्तरी-गोवा) : आयी (ता. दोडामार्ग) येथील नवदुर्गा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वनभोजनासाठी हरवळे गोवा येथे घेऊन जाणारा मिनी टेम्पो उलटल्याने झालेल्या अपघातात चौदा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यापैकी आठ विद्यार्थ्यांवर साखळी येथे, तर गंभीर असलेल्या सहाजणांवर गोवा बांबोळी येथील जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज, गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास साखळी रवींद्र भवनानजीक घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रशालेच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवास सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, टेम्पोचालक उमेश तळकटकर याला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आयी येथील नवदुर्गा माध्यमिक विद्यालयाने आज हरवळे गोवा येथे वनभोजनासाठी जाण्याचा बेत आखला. सकाळी नऊच्या सुमारास प्रशालेतील तीस विद्यार्थी व तीस विद्यार्थिनी वनभोजनास जाण्यास निघाले. त्यासाठी दोन मिनी टेम्पो ठरविण्यात आले. एका टेम्पोत मुले, तर दुसऱ्यात मुली असा प्रवास सुरू झाला. साखळी गोवा येथील रवींद्र भवनामध्ये क्रांतिकारी लोकांवर आयोजित प्रदर्शनाला भेट देऊन वनभोजनासाठी जाण्याचे प्रयोजन आखण्यात आले होते. मात्र, धाटवाडा-पर्ये येथील व्यवस्थापन महाविद्यालयाजवळ पोहोचताच उतरणीवर असलेल्या एका वळणावर एका टेम्पोचालकाचा ताबा सुटला. टेम्पो तिथेच उलटला आणि अंदाजे पाच मीटर घसरत जाऊन रस्त्याकडेने बसवलेल्या पोलादी सुरक्षा कुंपणाला धडकला. टेम्पोत विद्यार्थी होते, तसेच शिक्षक आपल्या मुलीला घेऊन चालकासोबत केबिनमध्ये बसले होते. अपघात घडताच विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. उपस्थित नागरिकांनी टेम्पो बाजूला करत विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. संख्येबाबत संभ्रमअपघात घडलेल्या माल वाहतूक मिनी टेम्पोमध्ये शिक्षकवर्गाने खचाखच विद्यार्थी भरले होते, असे काही विद्यार्थ्यांकडून समजते. मात्र, त्या टेम्पोत फक्त २० विद्यार्थी होते, असे उज्ज्वला पर्येकर या शिक्षिका सांगत होत्या; पण प्रत्यक्ष आरोग्य केंद्रात २२ जणांवर उपचार केले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अशाप्रकारे भरून आणल्याने पालकांत संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत होती.