शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘गारठा’ संपला, कोल्हापुरात तापमानाचा पारा चढला 

By संदीप आडनाईक | Updated: February 6, 2024 18:57 IST

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरचे तापमान जाणवण्याइतपत वाढले आहे. दिवसभरात तापमान ३४ अंश सेल्सिअस होते. आठवडाभर हे तापमान ...

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरचे तापमान जाणवण्याइतपत वाढले आहे. दिवसभरात तापमान ३४ अंश सेल्सिअस होते. आठवडाभर हे तापमान असेच चढते राहील असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याने सकाळी नऊ वाजेपासूनच अंग भाजून निघणारे ऊन जाणवत होते. आठवड्यानंतर तापमानात किंचित घट होईल, असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.यंदा फेबु्वारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीचा कडाका राहिला. त्यानंतर एकदमच थंडी गायब होऊन तापमानात वाढ होत गेली. दोन दिवस तर तापमानात कमालीची वाढ झाली असून साधारणत: गेल्या आठवड्यापेक्षा सरासरी ७ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे.सकाळी सूर्याचे दर्शन दिल्यापासूनच भाजणाऱ्या सूर्य किरणांचा मारा सुरु होतो. नऊ वाजता तर अंग भाजण्यास सुरुवात होते. त्यानंतर पारा जसजसा वाढत जाईल तशी नागरिकांची घालमेल सुरू होते. दुपारी बारा वाजता तर घराबाहेर पडू वाटत नाही. दुपारी चार नंतर हळूहळू तापमान कमी होत जाते. शनिवारी दिवसभरात किमान १९, तर कमाल ३४ डिग्री तापमानाची नोंद झाली.

पुढील आठवड्यापर्यंत थंडीचे आवर्तनपश्चिम झंझावातातून तसेच २० डिग्री अक्षवृत्तादरम्यान उत्तर भारतात १२ किलोमीटर उंचीवरील तपाम्बरच्या पातळीतील ताशी २७० ते ३०० किमी वेगाने वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्याच्या झोतामुळे व एकत्रित घडामोडीमुळे महाराष्ट्राला माफक थंडी अनुभवायला मिळाली. आता या आठवड्यात थंडी काहीशी कमी होऊन तापमानात वाढ होणार आहे. परंतु, पुन्हा पश्चिम हिमालयीन क्षेत्रात नवीन पश्चिमी झंझावाताच्या परिणामातून तापमानाचा पारा घसरून थंडी पडण्याची शक्यता निवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

आगामी आठवड्यातील अंदाज (कमाल व किमान तापमान)मंगळवार : ३५ (१९)बुधवार : ३६ (१९)गुरुवार : ३६ (१९)शुक्रवार : ३६ (१८)शनिवार : ३५ (१९)रविवार : ३४ (१८)सोमवार : ३४ (१९)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरweatherहवामान