शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

थंडीची चाहूल, कोल्हापूर जिल्ह्यातील तापमान २ डिग्रीने घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:28 IST

मंगळवार (दि. ११) पासून तापमानात ३ ते ४ डिग्रीने घसरण होण्याची शक्यता

कोल्हापूर : चतुर्थीपासून म्हणजे उद्या (शनिवार) दुपारी ३ वाजताचे कमाल आणि पहाटे ५ वाजताचे किमान अशा दोन्हीही तापमानात हळूहळू २ ते ३ डिग्रीने घसरण होऊन संपूर्ण जिल्ह्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता जाणवते. मंगळवार(दि. ११)पासून तर पहाटेचे पाच वाजताच्या किमान तापमानात ३ ते ४ डिग्रीने घसरण होण्याची शक्यता आयएमडी पुणेचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.आताही पहाटे व रात्री सातनंतर बोचरे वारे जाणवते. रात्री उशिरा कामावरून घरी जाणाऱ्या लोकांना या वाऱ्याचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे अनेकजण स्वेटर, कानटोपी घेऊनच आता बाहेर पडू लागले आहेत. सध्या जिल्ह्यात भागपरत्वे कमाल तापमान २८ ते ३० डिग्री आणि किमान तापमान १७ ते १९ डिग्रीदरम्यान जाणवत आहे. हे कमाल तापमान सरासरीच्या २ डिग्रीने कमी आणि किमान तापमान सरासरीच्या २ डिग्रीने अधिक आहे.मात्र, दुपारचे कमाल तापमान २९ डिग्रीच्या आसपास असून सरासरीच्या २ डिग्री आणि पहाटेचे ५ वाजण्याचे किमान तापमान २१ ते २३ डिग्रीदरम्यान असून ते सरासरीच्या २ डिग्रीने खालावलेले आहे. सध्या उत्तर भारतात बळकट पश्चिमी झंझावातामधून हंगामाला साजेशी बर्फवृष्टी होत आहे. राज्यात येत्या दोन दिवसांनंतर आकाश निरभ्र जाणवेल, असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.

पावसाची शक्यता नाहीदरम्यान, माणिकराव खुळे यांनी फक्त ढगाळ वातावरणाची शक्यता असून आकाश निरभ्र जाणवेल तसेच पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

या आठवड्याचा तापमानाचा अंदाजदिनांक - कमाल - किमान

  • ७ नोव्हेंबर - ३० - १९
  • ८ नोव्हेंबर - ३० - १९
  • ९ नोव्हेंबर - २९ - १९
  • १० नोव्हेंबर - २८ - १९
  • ११ नोव्हेंबर - २८ - १७
  • १२ नोव्हेंबर - २८ - १९
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Experiences Cold Snap: Temperature Drops by Two Degrees

Web Summary : Kolhapur is bracing for colder days. Temperatures are expected to fall by 2-4 degrees Celsius starting this week, according to weather experts. Clear skies are expected, with no rain predicted.