शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘विवेकानंद’तर्फे शिक्षक आपल्या दारी.... अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:27 IST

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने वाघवे (ता. पन्हाळा ) येथील विद्यार्थिनींच्या घरी ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

महाविद्यालयात अनेक विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागांतील आहेत. विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर किंवा नोकरदार आहेत. त्यांना महाविद्यालयात येऊन आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे शक्य होत नाही. अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती कळावी, त्यांच्या अडचणींची उकल व्हावी, महाविद्यालयाच्या विविध पाठ्यक्रमांची माहिती व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची आवड, कल, त्यांची शैक्षणिक प्रगती यांसह त्यांच्या वर्गातील उपस्थितीची माहिती पालकांना घरबसल्या मिळत असल्याने या उपक्रमाबाबत पालकवर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे शिक्षक व पालक यांच्यातील हरवत चाललेला संवाद या माध्यमातून पुन्हा एकदा दृढ होत आहे. त्यासोबतच शिक्षक व विद्यार्थ्यांतील जिव्हाळा वाढण्यास मदत होत आहे, असे डॉ. दीपक तुपे यांनी सांगितले.प्राध्यापकांचे गट‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमात पाच ते सहा प्राध्यापकांचे २० गट तयार करण्यात आले आहेत. ३१ गावांमध्ये हे गट कार्यरत आहेत. या उपक्रमांतर्गत शिक्षक रोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत महाविद्यालयातील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसोबत संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा, करिअर दिशा निश्चित केली जाणार आहे. यासह त्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

आज शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालक जर महाविद्यालयात येत नसतील तर प्राध्यापकांनी पालकांच्या दारात जाऊन त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयीची माहिती देणे हा या उपक्रमांचा हेतू आहे.-प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर 

टॅग्स :Schoolशाळा