शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

गेल्या वर्षापासून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या सेवाही कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेमध्ये संलग्न केल्या आहेत. त्यानुसार ...

गेल्या वर्षापासून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या सेवाही कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेमध्ये संलग्न केल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या प्राथमिक शाळा, खासगी प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमधील शासनमान्य शिक्षक हे या मोहिमेत कार्यरत आहेत. प्रभाग समित्यांचे सचिव, लसीकरणाची नोंदणी करून घेणे, डाटा एंट्री करणे, वॉररूममध्ये काम हे शिक्षक करत आहेत. या कामाच्या माध्यमातून आम्ही रोज पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येत आहोत. आरोग्य, जीव धोक्यात घालून आम्ही काम करत आहोत. आमच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आम्हाला विमा संरक्षणाचे कवच द्यावे, अशी मागणी या शिक्षकांतून होत आहे.

या मोहिमेत काम करणारे शिक्षक म्हणतात

गेल्यावर्षीपासून आम्ही कोरोना साथ नियंत्रणासाठी काम करत आहोत. आमचा पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क येत आहे. त्यात कोणाचा मृत्यू झालेला नाही हे सुदैव आहे. शासनाने आमचा ५० लाखांच्या विमा कवचामध्ये समावेश करावा.

- राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ.

कोरोना विरोधातील लढाईत आम्ही शिक्षक फ्रंटलाईनला काम करत आहोत. आरोग्य, जीव धोक्यात घालून आम्ही कार्यरत आहोत. विमा संरक्षण नसल्याने आमच्या असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी शासनाने आम्हाला विमा संरक्षण द्यावे.

-सुभाष माने, विशालनगर, फुलेवाडी रिंगरोड

गेल्या वर्षातील दि. ७ मार्चपासून मी कोरोना नियंत्रणबाबत काम करत आहे. आता वर्ष झाले, तरी आम्हाला विमा संरक्षण मिळालेले नाही. कोरोनाची वाढती स्थिती पाहता शासनाने कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेतील शिक्षकांना विमा संरक्षण द्यावे.

-वसंत आडके, उचगाव.

चौकट

लस घेतलेल्या शिक्षकांची कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत प्रतिनियुक्तीवर सेवा संलग्न केली आहे. त्याबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही केली जात आहे. शासन नियमानुसार शिक्षकांना लाभ मिळतील. त्याबाबत पाठपुरावा केला जाईल.

-एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती

चौकट

आतापर्यंत पाच शिक्षकांचा मृत्यू

कोरोनामध्ये राज्यात गेल्या वर्षापासून आतापर्यंत सुमारे १२५ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. त्यांना शासनाचे विमा संरक्षण नव्हते. यंदाही ग्रामविकास विभागाने विमा कवचाबाबत काढलेल्या पत्रकात शिक्षकांचा उल्लेख नाही. त्यामध्ये सुधारणा करून शिक्षकांना समाविष्ट करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे राज्य प्रमुख (नगरपालिका, महानगरपालिका) सुधाकर सावंत यांनी सांगितले.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

या मोहिमेतील शहरातील शिक्षकांची एकूण संख्या : २५९

महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक : ८८

खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक : ६८

माध्यमिक शाळेतील (हायस्कूल) शिक्षक : १०३

===Photopath===

280421\28kol_1_28042021_5.jpg

===Caption===

डमी (२८०४२०२१-कोल-टिचर डमी)