शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका -: वडणगेच्या घटनेची गांभीर्याने दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:33 IST

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील विद्यार्थिनीचे मुख्याध्यापकाकडून झालेल्या शोषणाच्या घटनेची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ...

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील घटनांची यादी करण्याचे आदेश

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील विद्यार्थिनीचे मुख्याध्यापकाकडून झालेल्या शोषणाच्या घटनेची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये शिक्षकांकडून बालकांचे लैंगिक शोषण झालेल्या घटनांची यादी तयार करून त्यांना बडतर्फ करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चाईल्ड लाईन सल्लागार समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, केंद्र समन्वयक अनुजा खरंदळ यांची होती.

बालकांच्या शोषणाच्या घटनांमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्यास त्याच्या बडतर्फीसाठीही शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी संबंधित यंत्रणेला येथे दिले. करवीर तालुक्यातील वडणगे शाळेत घडलेल्या विद्यार्थिनीच्या शोषणाच्या घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात अशा घटनांची यादी तयार करण्याचेही आदेश दिले.केंद्र समन्वयक खरंदळ यांनी चाईल्ड लाईनसंदर्भात सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. बालकांच्या मदतीसाठी १०९८ ही हेल्पलाईन आहे.

या हेल्पलाईनवर फोन केल्यास शहरामध्ये असणारी चाईल्ड लाईन टीम १ तासामध्ये दिलेल्या पत्त्यावर पोहोचते. ही हेल्पलाईन १८ वयोगटापर्यंतच्या मुलांकरिता २४ तास कार्यरत आहे. आॅक्टोबर २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीत २२ बालविवाह थांबविण्यात आले आहेत, असे खरंदळ यांनी सांगितले.

चाईल्ड लाईनने जनजागृती करणारे फलक तयार करून शाळा, ग्रामपंचायत, शालेय ठिकाणी लावावेत; त्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन डॉ. कलशेट्टी यांनी दिले. 

वडणगेतील मुख्याध्यापक निलंबितवडणगे येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी गैरवर्तनप्रकरणी मुख्याध्यापक बाजीराव पाटील (मूळ गाव आमशी, ता. करवीर) यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश काढले. त्यांना शाहूवाडी पंचायत समितीच्या मुख्यालयात हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.करवीरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी शंकर यादव यांच्या फिर्यादीनुसार करवीर पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत (बाल लैंगिक छळ) पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार अहवाल दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

शाळेतील घटनांची जिल्हाधिकारी घेणार थेट माहितीशाळेमध्ये घडलेल्या घटनांची विस्तृत माहिती मला द्या. दाखल फिर्यादीची प्रत मेलवर मिळावी, यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर असणाºया जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती तत्काळ द्यावी. पालकांना शिक्षित करणे, त्यांचे जनजागरण करणे हेच बालविवाहावर योग्य उत्तर आहे.चाईल्ड लाईनने प्रशासनालासोबत घ्यावेचाईल्ड लाईननी स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन कार्यवाही करावी. ग्रामसेवक, तलाठी यांची मदत घेऊन होणाºया विविध मासिक बैठकांमध्ये त्यांच्यासह पालक यांची काय जबाबदारी आहे, याविषयी माहिती द्यावी. शिक्षण विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनीही चाईल्ड लाईनविषयी जनजागृती करण्यास प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित चाईल्ड लाईन सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी अनुजा खरंदळ, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आदी उपस्थित होते.

फेरचौकशी करून पुण्यातील शिक्षकाला केले बडतर्फपुण्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना १२ वर्षांपूर्वी शिक्षकाकडून लैंगिक शोषणाचा गुन्हा घडला होता. त्याच्या प्रकरणामध्ये खऱ्या साक्षीदारांना पुढे आणले नव्हते. ज्या साक्षीदारांना पुढे आणले ते फितूर झाले होते. परिणामी गुन्हेगार निर्दोष सुटला होता.निलंबित असणाºया त्या शिक्षकाला पुन्हा सेवेमध्ये घेण्याबाबतचा प्रस्ताव समोर आला. या प्रकरणाची नव्याने सविस्तर चौकशी करून त्यामध्ये मूळ हस्ताक्षरातील साक्षीदाराचा पुरावा, विविध उच्च न्यायालय यांचे निकाल, या सर्वांचा अभ्यास केला. त्या शिक्षकाची विभागीय चौकशी लावून त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले, अशी आठवण जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsexual harassmentलैंगिक छळTeacherशिक्षकcollectorजिल्हाधिकारी