शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सापडलेली ३ लाखाची रोकड गडहिंग्लजच्या शिक्षकाने दिली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 10:15 IST

गडहिंग्लजच्या आठवडा बाजारात रस्त्यावर सापडलेले ३ लाख रूपये संबंधित व्यापाऱ्याला परत देवून त्यांनी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचा धडा आपल्या कृतीतून देत अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे समाजाला दाखवून दिले. राजीव बसवंत सुतार असे त्या प्रामाणिक शिक्षकाचे नाव आहे.

ठळक मुद्दे ‘गडहिंग्लज’चा शिक्षकाने कृतीतून दिला मूल्यशिक्षणाचा धडा सापडलेली ३ लाखाची रोकड दिली परत

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लजच्या आठवडा बाजारात रस्त्यावर सापडलेले ३ लाख रूपये संबंधित व्यापाऱ्याला परत देवून त्यांनी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचा धडा आपल्या कृतीतून देत अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे समाजाला दाखवून दिले. राजीव बसवंत सुतार असे त्या प्रामाणिक शिक्षकाचे नाव आहे.हकीकत अशी, सुतार हे गडहिंग्जल तालुक्यातील माद्याळ कसबा नूल येथील रहिवाशी होत. थोर गांधीवादी दिवंगत मा. ना. कुलकर्णी यांनी सुरु केलेल्या दुंडगे येथील परिश्रम विद्यालयात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याच शाळेत ते सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात.आठवडा बाजारासाठी रविवारी ते गडहिंग्लजला आले होते. येथील लक्ष्मी रोडवर पायी फिरून बाजार करताना रस्त्यावर त्यांच्या पायाला एक जड प्लास्टिक पिशवी लागली. पिशवी उचलून पाहिले असता त्यात १००, ५०० व २ हजाराच्या नोटा होत्या.तात्काळ त्यांनी आपला बाजारहाट थांबवला आणि ती पिशवी आपल्या पिशवीत सुरक्षित ठेवून ‘त्या’ पिशवीच्या मालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, मोठी रक्कम हरविल्यामुळे भांबावलेला एक माणूस समोरून येताना त्यांना दिसला. विचारपूस केल्यानंतर त्याने आपली पिशवी हरवली असून ‘त्या’ पिशवीत ३ लाख रूपये असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी मिळून एका दुकानाच्या कट्टयावर बसून पिशवीतील रक्कम मोजली.‘ती पिशवी’ खानापूर (जि) बेळगाव येथील रामाप्पा हुक्केरी या व्यापाऱ्याची होती. आठवडाभर पुरवलेल्या मालाची रक्कम गोळा करून गावी जाताना त्यांची हातातून ती रस्त्यावर पडली होती. मोजल्यानंतर रक्कम तेवढीच भरल्याने ती पिशवी हुक्केरी यांचीच असल्याची खात्री झाल्याने सुतार यांनी ती त्यांना परत दिली. त्यातील ५ हजार रूपये त्यांनी त्यांना बक्षीस म्हणून देवू केली. परंतु, त्यांनी ती नम्रपणे नाकारली.शेतमजूर कुटुंबातील आई-वडिलांच्या घट्ट संस्कारामुळेच आपल्याकडून ही कृती घडली. दुसऱ्याच्या वस्तूला हातसुद्धा न लावण्याची शिकवण देणारे वडील आज हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया सुतार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली 

चांगुलपणा माणसाच्या हृदयात असावा लागतो. मूल्याबरोबर तडजोड म्हणजे दुसऱ्याबरोबर स्वत:च्याही नजरेतून उतरल्यासारखे असते. परंतु, गलेलठ्ठ पगार असणारी, मोठ्या हुद्यावरील माणसंदेखील लाच खात असताना आणि मेडिकल आॅफिसर म्हणून काम करताना ३० रूपयांची लाच घेताना डॉक्टरही सापडतो अशा काळात सुतार यांच्यासारखे कृतीशील शिक्षक समाजाला दीपस्तंभासारखे आहेत.- संपत गायकवाड, निवृत्त सहसंचालक, शिक्षण विभाग कोल्हापूर. 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर