शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना पगार अन् नोकरीचीही नाही शाश्वती! शिक्षकदिनी ज्ञानदातेच रस्त्यावर; आज शाळा ठेवणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:03 IST

पगार व नोकरीची खात्री नसल्याने बुधवारी, शिक्षकदिनी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कृती समितीतर्फे ६,५०० विनाअनुदानित शाळा बंद ठेवून, ४५ हजार शिक्षक

ठळक मुद्दे मागण्यांसाठी ठिकठिकाणी करणार आंदोलन

कोल्हापूर/मुंबई : पगार व नोकरीची खात्री नसल्याने बुधवारी, शिक्षकदिनी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कृती समितीतर्फे ६,५०० विनाअनुदानित शाळा बंद ठेवून, ४५ हजार शिक्षक ‘शासनाची महाआरती’ करून निषेध नोंदविणार आहेत.

अघोषित शाळांना घोषित करून त्वरित अनुदान द्यावे. दि. १ व २ जुलै रोजीच्या घोषित शाळांना त्वरित अनुदान घोषित करावे. २० टक्के अनुदानप्राप्त शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्यावे. २० टक्के शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना सेवासंरक्षण द्यावे. आदिवासी विकासक्षेत्रातील शाळांना शासन धोरणानुसार १०० टक्के अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी गेल्या १८ वर्षांपासून विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी विविध आंदोलनांच्या माध्यमातून लढा देत आहेत. राज्य सरकारने मार्च २०१७ मध्ये विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान जाहीर केले.

मात्र, प्रत्यक्षात ते प्रचलित नियमानुसार मिळालेले नाही. त्यासह अन्य मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक पावले पडलेली नाहीत. त्यामुळे या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयांसमोर ‘शासनाची महाआरती’ आंदोलन केले जाणार आहे. याअंतर्गत कोल्हापुरात दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या आंदोलनात मराठवाड्यातील शिक्षक आमदार विक्रम काळे सहभागी होणार आहेत.

२००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू न करण्याच्या निषेधात जुनी पेन्शन हक्क समितीचे शिक्षक काळ्या फिती लावून काम करतील. आहेत. मराठवाडा, विदर्भात वर्षानुवर्षे विनावेतन काम करणारे शिक्षक भीक मांगो आंदोलन करतील. अकोला, वाशिम व बुलडाण्यात ते काळ्या फिती लावून काम करतील. याआधीही या शिक्षकांनी व्यथा मांडली़ मात्र सरकारने दखल घेतली नाही़ वेळेवर वेतन मिळत नसल्याने आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी निषेध करतील.काळा दिवस पाळणारभीक मागून जमा झालेली रक्कम सरकारला पाठविणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. मनोज पाटील यांनी दिली.शाळांवर दृष्टिक्षेपमाध्यमिक, प्राथमिकविनाअनुदानित शाळा : ६५००  शिक्षक : ४५ हजारविद्यार्थ्यांची संख्या : सुमारे १० लाख

 

सरकारच्या निषेधार्थ आज, शिक्षकदिनी राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळा बंद ठेवून ‘शासनाची महाआरती’ आंदोलन केले जाणार आहे. याची शासनाने दखल घेतली नाही, तर २ आॅक्टोबरपासून महाआंदोलन सुरू केले जाणार आहे.- खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, राज्य (कायम)विनाअनुदानित शाळा कृती समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक