शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तावडे हॉटेल ते टोलनाका २० मिनिटांचा थरार : पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:41 IST

या ठिकाणी नंबर नसलेली कार येताच निरीक्षक सावंत यांच्यासह रणजित कांबळे व अन्य सहकाऱ्यांनी कारला पाठीमागून, तर पुढे लेनवर उभे असलेले पांडुरंग पाटील यांनी उजव्या व नामदेव यादव यांनी डाव्या बाजूने कव्हर केले. त्यांना पोलीस आहे, असे सांगून थांबण्याचा इशारा करताच समोरच्या पोलिसांच्या अंगावर कार घालत दुसºया लेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दुभाजकाला कार धडकून थांबली.

ठळक मुद्देटीमचा महासंचालकांच्या हस्ते होणार गौरव पालकमंत्री सतेज पाटील यांचा पुढाकार

कोल्हापूर : हुबळीहून कोल्हापूरच्या दिशेने पळून आलेल्या राजस्थानच्या तीन गँगस्टरना पकडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी तावडे हॉटेल ते किणी टोलनाका असा २0 मिनिटांचा थरारक पाठलाग केला. त्यानंतर किणी टोलनाक्यावर गँगस्टरने केलेल्या गोळीबाराची पर्वा न करता तिघा गँगस्टरच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक किरण भोसले, प्रशांत निशाणदार, कॉन्स्टेबल नामदेव यादव, पांडुरंग पाटील आणि रणजित कांबळे या शिलेदारांनी जिवाची बाजी लावली. त्यांच्यासह या टीमचा पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या हस्ते मुंबईत ३ फेब्रुवारीला विशेष गौरव केला जाणार आहे.

पुणे-बंगलोर महामार्गावर मंगळवारी (दि. २८) रात्री ८.३0 च्या सुमारास तावडे हॉटेलसमोर दबा धरून बसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पांढ-या रंगाची कार भरधाव पुण्याच्या दिशेने पास झाली. पथकाने या कारचा पाठलाग सुरू केला. निरीक्षक सावंत यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण भोसले, प्रशांत निशाणदार, रमेश ठाणेकर, समीर मुल्ला, मच्छिंद्र पटेकर यांना किणी टोलनाका येथे नाकाबंदीच्या सूचना दिल्या. पोलीस कर्मचारी सुनील इंगवले,नामदेव यादव, रणजित कांबळे, पांडुरंग पाटील, सुरेश पाटील, चंदू नणवरे, सुजय दावणे, नितीन चोथे, वैभव पाटील, सुभाष वरुटे, संतोष माने, रवींद्र कांबळे, अमर वासुदेव, सहायक निरीक्षक संतोष पवार व सत्यराज घुले, आदी किणी टोलनाका येथे रात्री नऊच्या सुमारास आले.

या ठिकाणी नंबर नसलेली कार येताच निरीक्षक सावंत यांच्यासह रणजित कांबळे व अन्य सहकाऱ्यांनी कारला पाठीमागून, तर पुढे लेनवर उभे असलेले पांडुरंग पाटील यांनी उजव्या व नामदेव यादव यांनी डाव्या बाजूने कव्हर केले. त्यांना पोलीस आहे, असे सांगून थांबण्याचा इशारा करताच समोरच्या पोलिसांच्या अंगावर कार घालत दुसºया लेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दुभाजकाला कार धडकून थांबली.

कारमध्ये बसलेल्या पाठीमागील गुन्हेगाराने ‘उन्हके उपर फायर करो’ असे म्हणताच कारचालकाच्या शेजारी बसलेल्या शामलालने हवालदार नामदेव यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांनी खाली वाकून कारचा दरवाजा बाहेरून दाबून धरत पाठीमागे आले. यावेळी शामलालने नामदेवला कव्हर करणाºया निरीक्षक सावंत यांच्या दिशेने गोळी झाडली. सावंत यांनी सर्व्हिस पिस्टलमधील आरोपीच्या दिशेने फायरिंग केले. यावेळी शामलाल आणि श्रवणकुमार पायावर गोळी लागल्याने जमिनीवर कोसळले. त्यानंतर तिघेही पोलिसांना शरण आले. हा थरार १0 मिनिटे सुरू होता.

  • गुंडांशी दोन हात करणा-या पोलिसांचा उद्या सत्कार

कोल्हापूर : किणी (ता. हातकणंगले) येथील टोलनाक्यावर धाडसाने व प्राणाची बाजी लावून राजस्थान येथील गुंडांशी दोन हात करणाºया कोल्हापूर दलातील दोन पोलीस कर्मचाºयांचा उद्या, शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.मंगळवारी रात्री किणी टोल नाक्यावर राजस्थान येथील कुख्यात बिष्णोई टोळीतील तीन गुंडांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस कर्मचाºयांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या टीमने जिगरबाज कामगिरी करून कोल्हापूर पोलीस दलाची शान वाढविली. नामदेव यादव, पांडुरंग पाटील या पोलीस कर्मचाºयांनी दाखविलेली कर्तव्य तत्परता निश्चितच कौतुकास्पद असून, या टीमच्या कामगिरीबद्दल उद्या त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.दरम्यान, घटना घडल्यानंतरही सोशल मीडियावर या घटनेची छायाचित्रे शेयर करत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक सुरू होते.आरोपी कुख्यात गुन्हेगार असल्याने ते पिस्तूल जवळ बाळगत असल्याची पूर्व कल्पना होती. किणी टोलनाक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करतेवेळी मोठ्या प्रमाणात असणारी प्रवाशांची, तसेच पथकातील पोलिसांची सुरक्षा लक्षात घेऊन सापळ्याचे नियोजन केले होते.- तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक

टॅग्स :tollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूर