शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

तावडे हॉटेल येथे ट्रक टर्मिनस करणार : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:31 IST

तावडे हॉटेल येथील राष्ट्रीय महामार्गालगत आरक्षित असणाऱ्या जागेवर महिन्यात ट्रक टर्मिनस महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे दिली.

ठळक मुद्देवाहतुकीच्या नियोजनासाठी पाहणी गाडीअड्डाही तावडे हॉटेल येथे स्थलांतरीत करण्याचे आदेश

कोल्हापूर : तावडे हॉटेल येथील राष्ट्रीय महामार्गालगत आरक्षित असणाऱ्या जागेवर महिन्यात ट्रक टर्मिनस महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे दिली.

शहरातील वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात त्यांनी ट्रक टर्मिनसची जागा, गाडीअड्डा आणि शिरोली नाका येथील जागेची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गाडीअड्डा येथे पार्किंग आणि भक्तिनिवासाची निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेशही दिले. गाड्डीअड्डा ट्रक टर्मिनस येथे स्थलांतर करण्याच्याही सूचना केल्या.कोल्हापूर शहरातील वाहतुकीच्या समस्यावर गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पाहणी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पालकमंत्री पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगर, तावडे हॉटेलसह शहरात पाहणी केली.पालकमंत्री पाटील म्हणाले,‘तावडे हॉटेल येथे महापालिकेची २३ एकर जागा असून यापैकी ट्रक टर्मिनससाठी जागा आरक्षित आहे. सध्या साडेतीन एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. त्यापैकी एक एकर जागेत महिन्याभरात ट्रक टर्मिनस सुरू करण्याचे नियोजन आहे. वीज पुरवठ्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. जेसीबीच्या सहाय्याने परिसराचे तातडीने सपाटीकरण करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. उर्वरित जागेवर पीक लावले असून, ते कापून घेण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात येथील सर्वच परिसर विकसित करून शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे.गांधीनगर परिसरातील मणेरमळा येथे महापालिकेची १ एकर जागा आहे. या जागेचीही पाहणी करण्यात आली. मात्र, या जागेत ट्रकचा प्रवेश अथवा बाहेर जाण्याचा मार्ग अडचणीचा असल्याने पुढील टप्प्यात येथील नियोजन करण्यात निर्णय झाला.

यावेळी स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, उपमहापौर संजय मोहिते, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक भूपाल शेटे, राहुल चव्हाण, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर, लॉरी असोसिएशनचे सुभाष जाधव, अशोक पोवार, रमेश मोरे, गणी आजरेकर, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले,

  • ट्रक टर्मिनसचा परिसर जेसीबीच्या साहाय्याने तत्काळ सपाटीकरण करून घ्या.
  • गाडीअड्डा तावडे हॉटेल येथील ट्रक टर्मिनस येथे स्थलांतर करणे,
  • महापालिकेने गाडीअड्डा येथील पार्किंग, भक्तनिवासाची तत्काळ निविदा काढा
  • शिरोली नाका येथील महापालिकेच्या जागा ताब्यात घेऊन आराम बस पार्किंग करणे
  • वाहने पार्किंग केल्यानंतर गाडीअड्डा ते अंबाबाई मंदिरसाठी ‘ई’ कारची सुविधा करणार
  • पार्किंग केलेली वाहने बाहेर जाण्यासाठी गाडीअड्डा ते विल्सन पूल मार्ग तयार करणे,

पहिल्या टप्प्यामध्ये तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या आरक्षित जागेत १०० ट्रक थांबतील, या क्षमतेचे ट्रक टर्मिनस करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूकीची कोंडी फुटावी यासाठी जे कांही करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल.सतेज पाटील, पालकमंत्री

तावडे हॉटेल येथे २३ एकर २० गुंठे जागा असून २० एकर जागा ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया केली जाणार आहे. संबंधितांना नोटीस काढून टिडीआरच्या माध्यमातून नुकसानभरपाई देऊन उर्वरित जागाही ताब्यात घेतली जाईल. शिरोली नाक्यालगत ४९ हजार स्क्वेअर फूट जागा महापालिकेची असून, या जागेचा वापर आरामबस पार्किंगसाठी करणे शक्य आहे.- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता. महापालिका

 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर