शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
3
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
4
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
5
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
6
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
9
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
10
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
11
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
12
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
13
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
14
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
15
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
16
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
17
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
18
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
19
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
20
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे

‘तौउते’मुळे जिल्ह्यातील २४.४२ हेक्टरला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तौउते’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असला तरी त्याची झळ कोल्हापूर जिल्ह्यालाही ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘तौउते’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असला तरी त्याची झळ कोल्हापूर जिल्ह्यालाही बसली आहे. या वादळी पावसाने जिल्ह्यातील २४.४२ हेक्टरवरील केळी, आंबा, पपई पिकांना मोठा फटका बसला. पाच तालुक्यांतील १८ गावांतील ४५ शेतकऱ्यांचे ३३ टक्यांपेक्षा अधिक असे, ४ लाखांचे नुकसान झाले आहे. नजर अंदाजानुसार नुकसान शासनाला कळवले असून मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन ‘तौउते’ चक्रीवादळ तयार झाले. या वादळाने कोकण किनारपट्टीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्याच, त्याशिवाय घरांचेही मोठे नुकसान झाले. कोल्हापुरातही १६ व १७ मे रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की ऊस, मका या पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला. आडसाल ऊस व मका आडवे झाले आहेत. भाजीपाल्याचेही नुकसान झाले त्याचबरोबर अनेक ठिकाणी आंब्याची झाडे उखडून पडली.

राज्य शासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाने पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये शासनाकडून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच मदत मिळते. त्यानुसार या वादळाने २४.४२ हेक्टरवरील पिके व फळबागांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शाहूवाडी तालुक्याला वादळाचा मोठा फटका बसला. या तालुक्यातील ३.५० हेक्टरवरील केळी, ०.६५ हेक्टरवरील पपई व १३.५० हेक्टरवरील आंबा असे १४.१५ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यातील पपई बागांनाही फटका बसला आहे. नुकसानीची माहिती कृषी विभागाने राज्य शासनाकडे कळवली आहे, आता मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

गारपिटीनंतर दुसरा दणका

‘तौउते’ चक्रीवादळापूर्वी आठ-दहा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात गारपीट झाली होती. यामध्ये भाजीपाल्याला फटका बसला होता. त्यानंतर ‘तौउते’च्या रूपाने दुसरे संकट आल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

तालुकानिहाय असे झाले नुकसान हेक्टरमध्ये -

तालुका गावांची संख्या कारले केळी पपई आंबा एकूण क्षेत्र नुकसान रुपयात

करवीर ५ ० १.५० ० ० १.५० २०,२५०

राधानगरी ५ ० ०.४४ ० ० ०.४४ ५,९४०

पन्हाळा १ ०.८३ ० ० ० ०.८३ ११,२०६

शाहूवाडी ६ ० ३.५० ०.६५ १३.५० १७.६५ ३,०१,९५०

शिरोळ १ ० ० ० ४.०० ४.०० ७२,०००

एकूण १८ ०.८३ ५.४४ ०.६५ १७.५० २४.४२ ४,११,३४६