शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
4
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
5
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
6
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
7
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
8
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
9
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
10
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
11
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
12
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
13
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
14
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
15
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
16
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
17
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
18
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
19
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
20
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली

तासगाव पंचायत समिती घेणार प्रज्ञाशोध परीक्षा...

By admin | Updated: January 10, 2015 00:19 IST

जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम : शाळांना नमुना पुस्तिकेचे वितरण

तासगाव : स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील गरीब परंतु गुणवंत मुले चमकावीत, या हेतूने तासगावच्या पंचायत समितीने ‘तासगाव प्रज्ञाशोध परीक्षा’ हा उपक्रम राबविण्याचा विधायक निर्णय घेतला आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेऊन न थांबता, प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दर्जेदार पुस्तक छापले आहे. विद्यार्थ्यांत पहिलीपासून स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची गोडी लागावी, नियमित अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याविषयी जाणीव निर्माण व्हावी, यासाठी सध्या पहिल्या टप्प्यात पहिलीच्या वर्गासाठी तासगाव प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात ‘टी. टी. एस’चा पॅटर्न तयार करण्यात आला आहे.नियमित अभ्यासक्रमासोबत स्वतंत्रपणे पंचायत समिती स्तरावर अशा पध्दतीने स्पर्धा परीक्षा घेणारी तासगाव पंचायत समिती ही जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती ठरली आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक या उपक्रमात सहभागी होऊन प्रत्यक्षात टी.टी.एस.चा नमुना तयार केला आहे.खासगी शैक्षणिक संस्था, शाळा, अभ्यास केंद्रे या माध्यमातून सध्या स्पर्धा परीक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. चौथीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असतेच. चौथीपासून पुढे वेगवेगळ्या राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे निकोप स्पर्धा निर्माण होऊन अशा पध्दतींच्या परीक्षांबाबत पहिलीपासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा तालुक्यातील शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यातील सर्व शाळांना नमुना पुस्तिका देण्यात आली आहे. मार्च-एप्रिलमध्ये ऐच्छिक पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून पहिली व दुसरीसाठीही ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील, गटशिक्षणाधिकारी पी. बी. दुर्गुळे, विमल माने, गटसमन्वयक आकाराम पाटील यांनी नुकतेच या पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. (वार्ताहर)या प्रज्ञाशोध परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रथम तालुक्यातील शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यातील सर्व शाळांना नमुना पुस्तिका देण्यात आली आहे. मार्च-एप्रिलमध्ये ऐच्छिक पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून पहिली व दुसरीसाठीही ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.