शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
4
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
5
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
6
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
7
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
8
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
9
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
10
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
11
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
12
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
13
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
14
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
15
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
16
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
17
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
18
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
19
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
20
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा

‘ताराराणी’ला सर्वाधिक ३३% जनाधार

By admin | Updated: November 5, 2015 00:45 IST

मतदारांनी दाखवला विश्वास : तिन्ही पक्षांची टीका गनिमी काव्याने परतावत मिळविले यश

राजाराम लोंढे - कोल्हापूर -महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जनाधार होण्याचा मान ताराराणी आघाडीला मिळालेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा तिन्ही बाजूने होणारा हल्ला त्याच ताकदीने परतवून लावला. त्यांच्या ३९ उमेदवारांना ३३ टक्के मते मिळाली असून मतदारांनी ‘कोल्हापूरकरांसह महाडिकही शहाणे’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप-ताराराणी ताकदीने उतरले होते. महापालिका झेंडा फडकावयाचाच या इर्षेने सर्वच पक्षांनी ‘साम, दाम, दंड’ या नीतीचा वापर केला. सर्वच पक्षांनी टीका-टिप्पणी केली पण खऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप-ताराराणी आघाडीत झडल्या. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. महाडिक कुटुंबीयांच्या राजकारणाचे थेट ऐतिहासिक दसरा चौकातून वाभाडे काढले. ‘एकाच घरात काँग्रेसचा आमदार, मुलगा भाजपचा आमदार आणि पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार, हे पाहिल्यानंतर ‘कोल्हापूरची जनता मूर्ख की महाडिक शहाणे’ अशी जहाल टीका आमदार मुश्रीफ यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिली होती. अखंड प्रचारात मुश्रीफ यांनी महाडिक व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाच टार्गेट करून आपला आगामी राजकारणातील इरादा स्पष्ट केला होता. केवळ आमदार मुश्रीफ यांनीच टीका केली नाही तर, राष्ट्रवादीच्या राज्य पातळीवरील (माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सोडून) नेत्यांनी ‘ताराराणी’ आघाडीवर टीकेची झोड उठविली होती. मतदानाची तारीख जशी जवळ येत होती, तशी आमदार मुश्रीफ यांच्या ‘मूर्ख व शहाणे’ या टीकेची चर्चा जोर धरत होती. या टीकेच्या माध्यमातून महाडिक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभा करून त्यांचा जनाधार कमी होईल, या हेतूनेच त्यांच्यावर हल्ला चढविला जात होता. आमदार मुश्रीफ यांच्या व्यक्तिगत टीकेनंतर आमदार महादेवराव महाडिक कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली. आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते म्हटल्यावर त्यांनी सर्व ताकद पणाला लावून ‘गनिमी काव्याने’ विरोधकांचा हल्ला परतवून लावला. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ताराराणी आघाडीला तिन्ही बाजूने घेरले होते. ‘ताराराणी’ हा हल्ला कसा परतवून लावते, याविषयी उत्सुकता होती; पण आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांचा हल्ला परतवून लावत आपण राजकारणात कच्चे नाही, हे दाखवून दिले. ‘भाजप-ताराराणी’ला सत्तेपर्यंत पोहोचता आले नसले तरी त्यांनी घेतलेली मते निश्चितच महत्त्वाची आहेत. ताराराणी आघाडीने ३९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यांनी १ लाख ५१ हजार ६७६ या झालेल्या मतांपैकी तब्बल ५१ हजार २१९ (३३ टक्के) मतदान घेऊन आपणच सर्वांत पुढे असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने ८० जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यांनी ३ लाख ७ हजार ३३५ या झालेल्या मतांपैकी ६२ हजार ८३२ मते (२०.३५ टक्के) घेतली. टक्केवारीत राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ‘ताराराणी’चा एक उमेदवार वगळता ३८ उमेदवार हे चारशे मतांच्या पुढे आहेत. निवडणुकीतील टीका, त्यानंतर झालेले मतदान व निकाल पाहता ‘कोल्हापूरकरांसह महाडिकच शहाणे’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षनिहाय मिळालेली मते अशीपक्षउमेदवारांची संख्यालढलेल्या जागाचे मतदानमिळालेली मतेटक्केवारीताराराणी३९१ लाख ५१ हजार ६७६५१ हजार २१९३३ भाजप४१ (पुरस्कृतसह)१ लाख ४० हजार ४०४५ हजार ४९०३२.४८ काँग्रेस८१३ लाख ११ हजार ९३७७६ हजार ५८४२४.५५राष्ट्रवादी८०३ लाख ७ हजार ३३५६२ हजार ८३२२०.३५शिवसेना८१३ लाख ११ हजार ९३७४४ हजार ३५४१४.२१ ‘ताराराणी आघाडी कडून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांपैकी फक्त एका उमेदवाराला ४०० च्या आत मते आहेत. ३८ उमेदवार हे चारशे मतांच्या पुढे आहेत.