शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

तळवडे दरोडा प्रकरण : जमीन खरेदी-विक्री एजंट पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 19:26 IST

शाहूवाडी तालुक्यातील आंबा-तळवडे येथील बांधकाम व्यावसायिक शांतय्या स्वामी यांच्या घरावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी १० लाखांची लुट केली.

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील आंबा - तळवडे येथील बांधकाम व्यावसायिक शांतय्या स्वामी यांच्या घरावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी १० लाखांची लुट केली. स्वामी यांनी चार महिन्यापूर्वी मोठ्या किंमतीला जमिनीची विक्री केली होती. यांच्याकडे पैसे असल्याचे फक्त जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एजंटाना माहित होते. त्यामुळे या व्यवहारातील कमिशन न मिळालेल्या एजंटानेच दरोडेखोरांना टीप दिली असल्याची घटनास्थळी चर्चा होती. स्थानिक व्यक्तीने ही माहिती दिल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याने या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे.

२४ नोव्हेबर रोजी कर्नाटकातील विजापूर येथे स्वामी यांच्या पुतण्याचे लग्न होते. घरी लग्नकार्य असल्याने स्वामी पैसे घरी आणून ठेवणार याची पक्की माहिती माहितीदाराने दरोडेखोरांना दिली असण्याची शक्यता आहे. त्याच रात्री दरोडेखोरांनी वेळ साधून दरोडा टाकून ही रक्कम लंपास केली.

शाहूवाडी तालुक्यात जमिनीची खरेदी विक्री जोरात सुरु आहे. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गालगतच्या जमिनीला चांगला दर येत आहे . आंबा - तळवडे येथे जमिनीचे दर तेजीत आहेत . त्यामुळे या व्यवसायात न पैसे गुंतविता एजंट मालामाल होत आहेत. एजंटाची साखळी आहे. काही एजंट शेतकऱ्यांची  फसवणूक करीत आहेत. त्यामुळे स्वामीच्या जमिन खरेदी विक्री व्यवहारात दुःखावलेल्या एजंट अथवा जमिनीसाठी पार्टी आणणाऱ्या एजंटाची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी