शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: स्वत:ची मालमत्ता असल्याचे भासवून ३९ लाखांचे कर्ज उचलले, शिरोळमध्ये स्टेट बँकेची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 13:41 IST

म्हैसाळच्या एकास अटक

शिरोळ : स्वतःची मिळकत आहे असे भासवून सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाने शिरोळ येथील स्टेट बँकेच्या शाखेला तारण देऊन ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अशोक मारुती कोरवी असे संशयिताचे नाव असून, शिरोळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, म्हैशाळ येथील संशयित अशोक कोरवी याने सिटी सर्व्हे नंबर २७३ मिळकत ही स्वतःची आहे असे बँकेला भासविले होते. त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक शाखेला तारण देऊन ३९ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम २५ जुलै २०१९ रोजी बँकेच्या खात्यामधून उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर आजअखेर कर्ज व त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केलेली नाही. यामुळे हे कर्ज थकीत झाले असल्याने या थकबाकीच्या रक्कम वसुलीबाबत शिरोळ स्टेट बँके शाखेने संबंधित कर्जदाराची पडताळणी केली असता संशयित आरोपी कोरवी यांनी बँकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बुधवारी शिरोळ पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार स्टेट बँक शिरोळ शाखेचे शाखाधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे.दरम्यान, संशयित कोरवी याने शिरोळ तालुक्यातील पूर्व भागातील एका नामांकित पतसंस्थेलाही सदरची मिळकत तारण दाखवून कर्जापोटी लाखो रुपये उचलल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ही संस्थाही आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असून, पोलिसांनी त्या संस्थेबरोबरच अन्य काही संस्थेमध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रकार झाला आहे का ? या दिशेने तपास सुरू केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकfraudधोकेबाजी