शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: संजीवकुमार झा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 14:29 IST

कोल्हापूर : सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक पुस्तकाचा सातत्याने वापर करावा; कारण निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती त्यामध्ये ...

ठळक मुद्देआचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: संजीवकुमार झा निवडणूक निर्णय अधिकारी-नोडल अधिकाऱ्यांंची बैठक

कोल्हापूर : सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक पुस्तकाचा सातत्याने वापर करावा; कारण निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती त्यामध्ये दिली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करा, असे निर्देश सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात आयोजित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक विकासकुमार आरोरा, संजीव सिंग, बाबू लाल मीना, अमर नाथ तलवदे, सुरेंद्र राम, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई यांनी विधानसभा निवडणूक तयारीचे संगणकीय सादरीकरण केले. निवडणुकीसाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण झाले असून, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सज्ज आहेत. त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी सर्व यंत्रणाही सतर्क असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.यावर विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करा, असे निर्देश संजीवकुमार झा यांनी दिले.

 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर